कॉमनवेल्थ स्पर्धेत आजच्या दिवशी आणखी एक पदक निश्चित झालं आहे. भारताने सेमीफायनलमध्ये सिंगापूरला 3-0 ने मात देत फायनलमध्ये जागा मिळवली आहे. आता भारताचा सुवर्णपदकासाठी मलेशियाविरुद्ध सामना होणार आहे.(Commonwealth 2022 Defending champions India blank Singapore to enter final)
असा रंगला सिंगापूरविरुद्ध सामना
सिंगापूरविरुद्धच्या सामन्यात सर्वात आधी पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या प्रसिद्ध जोडीने सिंगापूरच्या योंग ही आणि अँडी क्विक या जोडीवर 21-11 आणि 21-12 अशा सोप्या फरकाने विजय मिळवत भारताला सामन्यात 1-0 ची आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर महिला एकेरीचा सामना पार पडला. यामध्ये भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सिंगापूरच्या जिया मिन यू ला 21-11 आणि 21-12 अशा सरळ सेट्समध्ये मात देत विजय मिळवला.
नंतर पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने किन य्वूला 21-18, 21-15 च्या फरकाने मात देत सामना जिंकलाच आणि भारतालाही 3-0 च्या फरकाने विजय मिळवून दिला. आता भारत सुवर्णपदक मिळवण्यासाठी मलेशियाविरुद्ध अंतिम सामना खेळेल.
भारताची पदकसंख्या नऊवर
मीराबाई चानू, अचिंता शेउली, जेरेमी लालरिनुंगा यांनी सुवर्णपदक जिंकलं असून संकेत सरगर आणि बिंद्याराणी देवी यांनी रौप्य पदक मिळवलं आहे. तसंच गुरुराजा पुजारी यानेही कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.
सुशीला देवीने ज्युदोमध्ये रौप्य मिळवलं असून विजयकुमारनेही कांस्य पदक मिळवलं आहे. हरजिंदरनं मिळवलेल्या कांस्य पदकामुळे भारताची पदकसंख्या नऊवर गेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.