Mirabai Chanu  sakal
क्रीडा

Commonwealth Games 2022 Day 2: मीराबाईने भारताला दिले पहिले सुवर्ण पदक

Mirabai Chanu Wins Gold : मीराबाई चानूची 'गोल्डन' कामगिरी, वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले सुवर्णपदक

Kiran Mahanavar

Commonwealth Games 2022 Day 2 Live: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय वेटलिफ्टर्सनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तिन्ही पदके जिंकून सुवर्ण कामगिरी केली. मीराबाई चानूची 'गोल्डन' कामगिरी वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 49 किलो वजनी गटात विजेतेपद पटकावले आहे. त्याने एकूण 201 किलो वजन उचलून विक्रमी सुवर्णपदक जिंकले. भारतीय वेटलिफ्टर संकेतने रौप्य आणि गुरुराज पुजारीने कांस्यपदक जिंकले. पहिला दिवस भारतासाठी चांगला नव्हता.

मीराबाईने भारताला दिले पहिले सुवर्ण पदक

मीराबाई चानूची 'गोल्डन' कामगिरी वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 49 किलो वजनी गटात विजेतेपद पटकावले आहे. त्याने एकूण 201 किलो वजन उचलून विक्रमी सुवर्णपदक जिंकले. चानूने स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलून विजेतेपद पटकावले आणि खेळाचा विक्रमही केला.

Table Tennis : मलेशियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव

भारतीय महिला संघाचा सामना मलेशियाशी झाला. त्याची सुरुवात चांगली झाली नाही. कॅरेन लिन आणि ली सि एलिस यांनी भारताच्या रीथ टेनिन्सन आणि श्रीजा अकुला यांचा 11-7, 11-6, 5-11, 11-6 असा पराभव करत 1-0 अशी आघाडी घेतली.

मीराबाई चानूने स्नॅचमध्ये तिचा ऑलिम्पिक विक्रम मोडला

मीराबाई चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला आहे. चानूने स्नॅचमध्ये 88 किलो वजन उचलले. आतापर्यंत कोणत्याही वेटलिफ्टरला ही कामगिरी करता आली नव्हती.

Weightlifting : मीराबाई चानू

मीरबाई चानू आता 49 किलो ग्रॅम गटात आव्हान सादर करणार आहे. त्याने स्नॅचसाठी सुरुवातीचे 80 किलो आणि क्लीन अँड जर्कसाठी 105 किलो वजन निवडले आहे. चानूकडून भारताला खूप आशा आहेत.

Table Tennis : भारताच्या पुरुष संघाने उत्तर आयर्लंडचा 3-0 असा पराभव केला.

टेबल टेनिसच्या पुरुष सांघिक स्पर्धेत भारताने उत्तर आयर्लंडचा 3-0 असा पराभव केला. पहिल्या दोन सामन्यांनंतर हरमीत देसाईने ओवेन काटकार्टचा 3-2 असा पराभव करून भारताचा विजय निश्चित केला. भारताने हा सामना 3-0 ने जिंकला.

जोश्ना चिनप्पाने पहिला सामना जिंकला

जोश्ना चिनप्पाने 32 च्या फेरीत मेगन बेस्टचा 11-8, 11-9, 12-10 असा पराभव करत प्री-क्वार्टर फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. जोश्ना चिनप्पाने पहिला सामना जिंकला आहे.

संकेतच्या रौप्यपदकानंतर गुरुराजने कांस्यपदक जिंकले

भारतीय वेटलिफ्टर गुरुराज पुजारीने पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे दुसरे पदक आहे. या सामन्यातील सुवर्णपदक मलेशियाच्या मोहम्मद अंजीलने पटकावले. त्याचवेळी पापुआ न्यू गिनीच्या मोरे बेयूने रौप्य पदक जिंकण्यात यश मिळविले. गुरुराज पुजारीने केवळ 269 किलो वजन उचलून पदक जिंकले. पुजारीने स्नॅचमध्ये 118 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 151 किलो वजन उचलले. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

गुरुराज पुजारी सुवर्णपदक जिंकण्याच्या शर्यतीत

पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात गुरुराज पुजारीची स्पर्धा सुरू आहे. त्याच्याकडे सुवर्णपदक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. स्नॅचमध्ये, पुजारीने त्याच्या प्रयत्नात 115 किलो, दुसऱ्या प्रयत्नात 118 किलोमध्ये 113 किलो वजन उचलले आहे.

महिला संघातील खेळाडू नवज्योत कोरोना पॉझिटिव्ह

भारतीय महिला हॉकी संघाला सामन्यापूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. संघाची स्टार खेळाडू नवज्योत कौरला संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे

सांगलीच्या 'रूपेरी' कामगिरी करणाऱ्या संकेतची 'गोल्डन' प्रतिक्रिया

दुखापतीनंतरही भारताला सुवर्ण पदक पटकावून देण्याच्या जिद्दीने वजन उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सांगलीच्या संकेतला 55 किलो वजनी गटात रौप्य पदकावर समधान मानावे लागले. त्याचे सुवर्ण पदक अवघ्या एका किलोने हुकले. मात्र संकेतने पदार्पणाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्यावर गोल्डन प्रतिक्रिया दिली.

त्याने आपले रौप्य पदक देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अर्पण करत सर्वांची मने जिंकली.

वेटलिफ्टिंग : सांगलीच्या संकेत सरगरने पटकावले रौप्य पदक

क्लीन अँड जर्क प्रकारात पहिल्या प्रयत्नात 135 किलो वजन उचलण्यात संकेतला अपशय आले होते. मात्र त्याने दुसऱ्या प्रयत्नात यशस्वीरित्या 135 किलो वजन उचलत जोरदार पुनरागमन केले. एकूण 248 किलो वजन उचलून तो पुन्हा एकदा फायनलच्या यादीत अव्वल स्थानावर पोहचला. मात्र त्याला तिसऱ्या 139 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्न फसला. त्याच्या हाताला दुखापत देखील झाली. त्यानंतरही त्याने 141 किलो वजन उचलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तरी देखील तो सुवर्ण पदकाच्या रेसमध्ये होता. मात्र मलेशियाच्या मोहम्मदने संकेतपेक्षा एक किलो वजन जास्त उचलत अखेरच्या क्षणी संकेतकडून सुवर्ण पकद हिसकावले.

वेटलिफ्टिंग : संकेत सारगर टॉपवर

भारताचा वेटलिफ्टर संकेत सारगरने 55 किलो वजनीगटात स्नॅच प्रकारात पहिल्याच प्रयत्नात 107 किलो वजन उचलत यादीत टॉप स्पॉट पटकावला.

त्यानंतर त्याने दुसऱ्या संकेतने 111 किलो वजन उचलून अंतिम फेरीतला आपला पहिला क्रमांक कायम ठेवला.

तिसऱ्या प्रयत्नात संकेतने 113 किलो वजन उचलत आपला दबदबा सिद्ध केला.

स्नॅच प्रकारात टॉवर असलेल्या संकेतने क्लीन अँड जर्क प्रकारात 135 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न फसला.

बॅडमिंटन: पोनप्पा-सात्विक जोडी जिंकली

अश्विन पोनप्पा आणि सात्विक साईराज रँकीरेड्डी या जोडीने मिश्र दुहेरीत श्रीलंकेच्या सचिन दास आणि थिलिनी हेंडाहेवा यांच्यावर 21-14, 21-19 अशी मात केली.

बॅडमिंटन : भारताकडे आघाडी 

बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि अश्विन पोनप्पा यांनी श्रीलंकेच्या जोडीवर 21-14 असा पहिला गेम जिंकून आघाडी घेतली आहे.

वेटलिफ्टिंगपासून सुरुवात

पुरुष ५५ किलो वजनी गटात स्पर्धा सुरू झाल्या आहेत. भारताचा संकेत महादेव यामध्ये खेळत असून त्याच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

लॉन बॉलमध्ये तानिया हरली

भारताने दुसऱ्या दिवसाच्या मोहिमेची सुरुवात लॉन बॉलने केली. तानिया चौधरीने वेल्सच्या लॉरा डॅनियल्सविरुद्ध महिला एकेरीच्या फेरी-3 मध्ये प्रवेश केला. या सामन्यात तानियाचा पराभव झाला.

जाणून घ्या भारताचे आजचे शेड्यूल

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज अनेक स्पर्धांमध्ये सामने रंगणार आहे. 30 जुलै रोजी होणार्‍या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे भारताचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT