Commonwealth Games 2022 Birmingham Day 8 sakal
क्रीडा

CWG 2022 : कुस्तीपटूंच्या नावावर आठव्या दिवशी 6 पदक; भारताच्या खात्यात आत्तापर्यंत 26

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सच्या आठव्या दिवशी भारताने पदकांचा पाऊस पडला

Kiran Mahanavar

Commonwealth Games 2022 Birmingham Day 8 : बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सच्या आठव्या दिवशी भारताने पदकांचा पाऊस पडला. आठव्या दिवशी कुस्तीला सुरुवात झाली. साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि दीपक पुनियाने सुवर्ण पदक जिंकले. तर पदार्पण करणाऱ्या अंशू मलिकने रौप्य तर दिव्या काकरानने कांस्य पदक पटकावले. भारताने तापर्यंत जिंकलेल्या 26 पदकांमध्ये 9 सुवर्ण 8 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारतीय संघ सध्या पदकतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. याचबरोबर भारतीय पुरूष लॉन बॉल्स संघाने देखील अंतिम फेरी गाठत आपले रौप्य पदक निश्चित केले आहे.

कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टर्सच्या यंदाच्या कामगिरी अप्रतिम होती. आता कुस्तीपटूंनीही विशेष कामगिरी केली आहे, सहाच्या सहा कुस्तीपटूंनी पदकावर नाव कोरलं आहे. ज्यामुळे भारताची पदकसंख्या 26 वर गेली आहे. तसंच लॉन बाऊल्समध्ये पुरुषांच्या गटाने इंग्लंडला 13-12 ने मात देत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताचं किमान रौप्यपदक निश्चित झालं.

भारताची पदकसंख्या :

9 सुवर्ण : मीराबाई चानू, जेरेमी लालरिगुंना, अंचिता शेऊली, महिला लॉन बॉल्स संघ, टेबल टेनिस पुरूष संघ, सुधीर (पॅरा वेटलिफ्टिंग), साक्षी मलिक, बजरंग पुनिया, दीपक पुनिया

8 रौप्य : संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशिला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंजू मलिक

9 कांस्य : गुरूराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरभ घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्विन शंकर, दिव्या काकरान, मोहित ग्रेवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

SCROLL FOR NEXT