Commonwealth Games 2022  sakal
क्रीडा

Commonwealth Games 2022 : ट्रक ड्रायव्हरच्या मुलाने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले कांस्यपदक

भारताचा अनुभवी वेटलिफ्टर गुरुराजा पुजारीने बर्मिंगहॅममध्ये चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले.

Kiran Mahanavar

Commonwealth Games 2022 : भारतीय वेटलिफ्टर गुरुराज पुजारीने पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे दुसरे पदक आहे. या सामन्यातील सुवर्णपदक मलेशियाच्या मोहम्मद अंजीलने पटकावले. त्याचवेळी पापुआ न्यू गिनीच्या मोरे बेयूने रौप्य पदक जिंकण्यात यश मिळविले. गुरुराज पुजारीने केवळ 269 किलो वजन उचलून पदक जिंकले. पुजारीने स्नॅचमध्ये 118 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 151 किलो वजन उचलले.

विजेत्या गुरुराजाचा आतापर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. त्याचे वडील ट्रक चालक होते. गुरुराजाला आणखी चार भाऊ आहेत आणि एवढ्या मोठ्या कुटुंबासोबत राहणे कधीच सोपे नव्हते. गुरुराजाचे वडील त्याला वेटलिफ्टरला आवश्यक असलेला आहार देऊ शकत नव्हते. पण या गरीब कुटुंबातील मुलाने हार मानली नाही. वेटलिफ्टरपूर्वी गुरुराजा कुस्तीपटू होता. 2008 साली सुशील कुमारने ऑलिम्पिक पदक जिंकून हा खेळाडू खूप प्रभावित झाला होता. कर्नाटकातील उडीपी जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणाऱ्या गुरुराजाने आपणही देशासाठी पदक जिंकणार असा निर्धार केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati in Texas: अमेरिकेत दुमदुमला कसबा गणपतीचा जयघोष ; ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाकडून पुण्याच्या ग्रामदैवताची प्रतिष्ठापना

Viral Video : विमान हवेत असताना दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT