Indian weightlifter Jeremy Lalrinnunga win gold medal sakal
क्रीडा

Commonwealth Games 2022 : वेटलिफ्टिंगमध्ये डबल गोल्ड धमका; जेरेमी लालरिनुंगाने जिंकले सुवर्ण

जेरेमी लालरिनुंगाने वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी जिंकले दुसरे सुवर्णपदक

Kiran Mahanavar

Jeremy Lalrinnunga Win Gold Medal : बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताच्या जेरेमी लालरिनुंगाने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात रविवारी स्नॅचमध्ये 140 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो असं एकूण 300 किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकले आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेतील भारताचं हे दुसरं सुवर्णपदक आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं पाच पदकं जिंकली आहेत. भारतानं हे सर्व पदक वेटलिफ्टिंगमध्येच जिंकली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत 5 पदके जिंकली असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. जेरेमी लालरिनुंगापूर्वी शनिवारी संकेत महादेव सरगरने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. त्यानंतर गुरुराजा पुजारीने 61 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. त्याचवेळी ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. बिंदियारानी देवीने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला चौथे पदक मिळवून दिले. त्याने 55 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासातील वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे 130 वे पदक आहे. भारतापेक्षा फक्त ऑस्ट्रेलियाने जास्त पदके जिंकली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: बॉक्सर्सची गोल्डन कामगिरी! ३० मिनिटांत ३ सुवर्णपदकं... अरुंद्धती चौधरीचे निर्विवाद वर्चस्व; भारताची Medal Tally मध्ये मोठी झेप...

Commonwealth Games 2026 : २२ वर्षीय प्रियाची पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा अन् सुवर्णपदक... शेतकऱ्याच्या लेकीने इतिहास घडवला

Deportation Rule: राष्ट्रीयत्वाची खात्री झाल्याशिवाय हकालपट्टी नाही; सर्वोच्च न्यायालयात केंद्राची भूमिका, निर्वासनासाठी ३ अटी अनिवार्य

Commonwealth Games 2026 : साक्षी चौधरीचा गोल्डन पंच; भारतीय सैन्यात असलेल्या पोरीने जग जिंकलं! ज्युदोत उन्नतीची कांस्य क्रांती

IND vs SL : श्रीलंकेचा रडीचा डाव! भारतीय संघाला पुरेसा सराव मिळू नये म्हणून लढवली शक्कल; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT