Commonwealth Games 2022 boxing Semi final 
क्रीडा

Commonwealth Games 2022 : नीतू, मोहम्मदने केले पदक पक्के

राष्ट्रकुल स्पर्धा : बॉक्सिंगमध्ये आपापल्या गटात उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा

बर्मिंगहॅम : भारतीय बॉक्सर्सनी बुधवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील आणखी दोन पदके निश्‍चित केली. नीतू गंघास व मोहम्मद हुसामुद्दीन या बॉक्सर्सनी आपापल्या गटात प्रतिस्पर्ध्यांना दमदार पंचेस मारत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयासोबतच दोन्ही बॉक्सर्सनी किमान ब्राँझपदक पक्के केले.

नीतू महिला विभागाच्या ४८ किलो वजनी गटात सहभागी झाली होती. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तिच्यासमोर उत्तर आयर्लंडच्या निकोल क्लाईडचे आव्हान होते. या लढतीत नीतूने प्रतिस्पर्ध्याला दया दाखवली नाही. नीतूने सुरुवातीपासूनच छान खेळ केला. नीतूच्या झंझावातासमोर निकोल क्लाईड तग धरू शकली नाही. दुसऱ्या फेरीनंतर तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. अखेर तिच्या प्रशिक्षकांनी निकोल क्लाईडला या लढतीमधून माघार घेण्यास सांगितले. त्यानंतर नीतूला एबीडी अर्थातच प्रतिस्पर्ध्याने लढत सोडून देणे याच आधारावर विजयी घोषित करण्यात आले.

सलग दुसरे पदक

भारताच्या मोहम्मद हुसामुद्दीन याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील सलग दुसरे पदक आपल्या नावावर केले. त्याने गोल्ड कोस्टमध्ये २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ब्राँझ पटकावले होते.

रोहित टोकासची आगेकूच

भारताच्या रोहित टोकास याने मंगळवारी मध्यरात्री झालेल्या पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटातील लढतीत घानाच्या अल्फ्रेड कोटे याला ५-० अशा फरकाने सहज नमवले. या विजयामुळे रोहितला उपांत्यपूर्व फेरी गाठता आली. आता तो पदकापासून एक पाऊल दूर आहे. रोहितची उपांत्यपूर्व लढत ४ ऑगस्ट (उद्या) रोजी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : जानेवारीच्या पगारात 8व्या वेतन आयोगाची वाढ मिळेल का? किती वाढणार पगार? जाणून घ्या पगारवाढीबाबत मोठा अपडेट

मराठी अभिनेत्रीला लागली लॉटरी! नुकतीच सुरू झाली नवीन मालिका; आता चित्रपटही येणार, कोण आहे ती?

हो की नाही एवढंच बोला! मला बोलायचंय म्हणणाऱ्या वाल्मिक कराडला कोर्टानं फटकारलं; सुनावणीत काय घडलं?

Navneet Rana : मौलानाला चार बायका १९ मुलं, आता हिंदूंनीही ४ मुलं जन्माला घाला; भाजप नेत्या नवनीत राणांचं खळबळजनक विधान

रुग्णाला घेऊन जाणारं अमेरिकन नौदलाचं विमान कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, तिघे बेपत्ता

SCROLL FOR NEXT