Commonwealth Games 2022 Sharath Kamal and Sathiyan win silver in men doubles  
क्रीडा

CWG 2022 : टेबल टेनिसमध्ये शरथ कमल व साथियन जोडीने पटकावले रौप्यपदक

CWG 2022 : टेबल टेनिसमध्ये भारताला आणखी एक पदक

Kiran Mahanavar

Commonwealth Games 2022 : टेबल टेनिसमध्ये भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. अचंता शरथ कमल आणि जी साथियान यांनी रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीत रौप्यपदक पटकावले. अंतिम फेरीत या जोडीला इंग्लंडच्या पॉल ड्रिकहॉल आणि लियाम पिचफोर्ड या जोडीने त्यांना 11-8, 8-11, 3-11, 11-7, 4-11 ने पराभूत केले. इंग्लंडची जोडी आपले विजेतेपद राखण्यात यशस्वी ठरली आहे.

इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल व लिएम पिचफोर्ड यांनी भारतीय जोडीला कडवी टक्कर दिली. भारतीय जोडीने पहिला गेम जिंकला, परंतु इंग्लंडच्या खेळाडूंनी पुढील दोन गेम जिंकून सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली.

चौथा गेम निर्णायक होता, त्यात भारतीय जोडीने 11-7 असा जिंकून 2-2 अशी बरोबरी केली. इंग्लंडच्या खेळाडूंनी 8-4 अशी आघाडी घेतली. इंग्लंडच्या जोडीने 11-4 असा विजय मिळवून सुवर्णपदक नावावर केले. भारतीय जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT