Commonwealth Games 2022 
क्रीडा

CWG 2022: अचंथा आणि श्रीजाच्या जोडीने इतिहास रचला, मिश्र दुहेरीत जिंकले सुवर्णपदक

भारतीय मिश्र दुहेरी संघाने टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावले. टेबल टेनिसमध्ये भारताने आणखी एक सुवर्ण जिंकले आहे.

Kiran Mahanavar

Commonwealth Games 2022 : भारतीय मिश्र दुहेरी संघाने टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावले. टेबल टेनिसमध्ये भारताने आणखी एक सुवर्ण जिंकले आहे. मिश्र दुहेरीत भारताच्या अचंथा शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी चुंग जावेन आणि लिन करेन या मलेशियाच्या जोडीचा 11-4, 9-11, 11-5, 11-6 असा पराभव करत सामना 4-1 असा जिंकला. म्हणजेच भारतीय जोडीने चार गेम जिंकले, तर मलेशियाच्या जोडीने एक गेम जिंकला.

टेबल टेनिस संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या शरथ कमलने आतापर्यंत 5 सुवर्ण, दोन रौप्य व 3 कांस्य अशी एकूण 10 पदके पटकावले आहे. 2006 मध्ये त्याने पुरुष एकेरीत व पुरुष सांघिक गटाचे सुवर्ण जिंकले. 2010 मध्ये पुरुष दुहेरीत सुवर्ण, 2018 व 2022 मध्ये पुरूष सांघिक गटाचे सुवर्ण त्याच्या नावावर आहे. 2018 मध्ये पुरुष एकेरी व मिश्र दुहेरीत कांस्य जिंकले आहे.

भारताच्या युवा टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाला चिवट खेळीनंतर कांस्यपदकाच्या लढतीत हार मानावी लागली. श्रीजाला महिला एकेरीच्या कांस्यपदकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या यांगजी लियूकडून 11-3, 6-11, 2-11, 11-7, 13-15, 11-9, 7-11 असा पराभव पत्करावा लागला. अचंथा शरथ पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉलवर 11-8,11-8, 8-11, 11-7, 9-11, 11-8 असा विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT