Shooting archery wrestling will also be excluded from next Commonwealth Games File Photo
क्रीडा

Commonwealth Games Association : नेमबाजीचा समावेश कुस्तीला वगळले

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संघटनेकडून खेळांची यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेच्या संघटनेकडून २०२६ मध्ये व्हिक्टोरिया येथे होणार असलेल्या क्रीडा महोत्सवातील खेळांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये नेमबाजी या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. बर्मिंगहॅम येथे या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या खेळाला वगळण्यात आले होते. मात्र व्हिक्टोरियामधील स्पर्धेत या खेळाचे पुनरागमन करण्यात आले आहे. पण कुस्ती या खेळाला पुढील प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवातून वगळण्यात आले आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेच्या संघटनेकडून करण्यात आलेली घोषणा भारतासाठी ‘कही खुशी कही गम’ यासारखीच ठरली आहे. भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये नेमबाजी या खेळात आतापर्यंत सर्वाधिक १३५ पदके पटकाविली आहेत. तसेच कुस्तीमध्ये ११४ पदके जिंकण्यात भारतीयांना यश लाभले आहे. तिरंदाजीत भारतीयांना आठ पदके पटकावता आलेली आहेत. पुढील स्पर्धेमध्ये कुस्ती व तिरंदाजी हे दोन्ही खेळ नसणार आहेत. त्यामुळे हे भारतासाठी निश्‍चितपणे निराशाजनक असणार आहे.

व्हिक्टोरिया (२०२६) स्पर्धेतील खेळ- ॲथलेटिक्स व पॅरा ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, पॅरा बास्केटबॉल (३ बाय ३ व ३ बाय ३ व्हीलचेअर), बॉक्सिंग, बीच व्हॉलीबॉल, कोस्टर रोईंग, टी-२० क्रिकेट (महिलांसाठी फक्त), सायकलिंग (बीएमएक्स, माऊंटन बाईक, रोड, ट्रॅक आणि पॅरा ट्रॅक), डायव्हींग, गोल्फ, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, लॉन बॉल्स व पॅरा लॉन बॉल्स, नेटबॉल, पॅरा वेटलिफ्टिंग, रग्बी सेव्हन्स, नेमबाजी व पॅरा नेमबाजी, स्क्वॉश, टेबल टेनिस व पॅरा टेबल टेनिस, ट्रायथलॉन व पॅरा ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग.

गोल्फ, रोईंगचा पहिल्यांदाच सहभाग

व्हिक्टोरिया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये तीन नव्या खेळांचा पहिल्यांदाच समावेश होणार आहे. यामध्ये गोल्फ, बीएमएक्स रेसिंग व रोईंग या खेळांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेमध्ये २२ खेळाडूंच्या २६ क्रीडा शर्यतींमध्ये खेळाडू सर्वस्व पणाला लावणार आहेत. यामध्ये नऊ पॅरा खेळांचा समावेश असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT