comparison with Umran Malik Shoaib Akhtar hilarious reply ESAKAL
क्रीडा

Shoaib Akhtar : 'युट्यूब चॅनेलमधून मी उमरानपेक्षा जास्त वेगाने फेकतो'

अनिरुद्ध संकपाळ

Umran Malik : भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकची (Umran Malik) पाकिस्तानचा स्पीडस्टार शोएब अख्तरशी (Shoaib Akhtar) कायम तुलना होत असते. उमरान मलिक शोएब अख्तरचे सर्वात वेगवान चेंडूचे वर्ल्ड रेकॉर्ड तोडणार का अशी चर्चा सुरू असते. अनेकांच्या मते तर 22 वर्षांचा उमरान शोएब अख्तरचे रेकॉर्ड नक्की मोडेल. (Shoaib Akhtar Latest Marathi News)

शोएब अख्तरने 22 फेब्रुवारी 2003 ला 161.3 किलोमिटर प्रती तास वेगाने चेंडू (World Fastest Delivery) टाकला होता. हा चेंडू त्याने इंग्लंडविरूद्ध आसीसीच्या वर्ल्डकपमध्ये टाकला होता. या वेगवान चेंडूचा सामना निक नाईटने केला होता. या षटकातील बाकीचे चेंडू हे हे 153.3, 158.4, 158.5, 157.4 आणि 159.5 किलोमिटर प्रती तास वेगाने टाकण्यात आले आहे.

दरम्यान, शोएब अख्तरला त्याची आणि उमरान मलिकची तुलना केली जाते याबाबत विचारले असता त्याने गंमतीने उत्तर दिले. की, 'युट्यूब चॅनेलमधून मी त्याच्यापेक्षा जास्त वेगाने फेकतो.'

उमरान मलिकने आयर्लंडविरूद्धच्या टी 20 मालिकेत भारताकडून पदार्पण केले. त्याचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत देखील संघात समावेश करण्यात आला होता. त्याने आयपीएल 2022 मध्ये केलेल्या दमदार कामगिरीनंतर त्यासाठी टीम इंडियाची दारे उघडली होती. मलिकने आयपीएल हंगामात सनराईजर्सकडून खेळताना 22 विकेट घेतल्या होत्या. इंग्लंडमध्ये होत असलेल्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत देखील उमरान मलिकची वर्णी लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT