D Gukesh Chess sakal
क्रीडा

D Gukesh Chess : विश्‍वनाथन आनंद माझे प्रेरणास्थान : गुकेश,आव्हानवीरांची स्पर्धा जिंकणाऱ्या पठ्ठ्याचे मायदेशात अभूतपूर्व जल्लोषात स्वागत

आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा जिंकून जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी दावेदार ठरलेल्या डी. गुकेश याचे गुरुवारी मायदेशात अभूतपूर्व जल्लोषात स्वागत करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा जिंकून जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी दावेदार ठरलेल्या डी. गुकेश याचे गुरुवारी मायदेशात अभूतपूर्व जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारताच्या १७ वर्षीय या पठ्ठ्याने याप्रसंगी महान खेळाडू विश्‍वनाथन आनंद आपले प्रेरणास्थान असल्याचे उद्‌गार काढले. तो म्हणाला, ‘‘आनंद सर नसते तर मी आता जे मिळवले आहे, त्याच्या जवळपासही पोहचू शकलो नसतो.’’

डी. गुकेश याने भारतात पाऊल ठेवल्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आपली मते व्यक्त केली. या वेळी तो म्हणाला, ‘‘आनंद सर माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेतल्याचा मला फायदा झाला. माझ्या कारकीर्दीत या अकादमीकडून प्रमुख भूमिका बजावण्यात आली. आनंद सरांमुळेच मला इथपर्यंत मजल मारता आली आहे.’’

डिंग लिरेनविरुद्धची जगज्जेतेपदाची लढत ही अत्यंत मोठ्या स्तरावरील असणार आहे. मी या लढतीची तयारी कशाप्रकारे करतो हेच प्रमुख आव्हान असणार आहे. योग्य मानसिक क्षमतेने मला जगज्जेतेपदाच्या लढतीत उतरावे लागणार आहे.

-डी. गुकेश, आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेतील विजेता

स्वत:वर विश्‍वास

डी. गुकेश पुढे म्हणाला, ‘‘जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी माझ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सर्व काही पणाला लागले आहे. आव्हानवीरांच्या स्पर्धेत ज्या योजनांसह खेळलो, त्याच योजना अमलात आणण्याचा प्रयत्न करीन. माझा स्वत:वर विश्‍वास आहे. माझ्या योजना यशस्वी होतील, अशी आशा करतो.’’

ग्रँड वेलकम

डी. गुकेश याचे मायदेशात जल्लोषात स्वागत करण्यात आले. चेन्नई येथील विमानतळावर गुकेश येण्याआधी एक तास वेलाम्मल विद्यालयातील हजारो मुले उपस्थित होती. गुकेश हे पाहून भारावून गेला. तो म्हणाला, ‘‘विमानतळावर शाळकरी मुलांचा उत्साह पाहून माझा विजय देशासाठी किती महत्त्वाचा होता हे समजले. माझ्यासाठी हे खास आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT