शारजील खान 
क्रीडा

स्पॉट फिक्‍सिंगची कबुली दिल्यासच खेळू देणार

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये स्पॉट फिक्‍सिंग केल्याची कबुली दिलीस, त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण केलास, तरच खेळण्याची संधी मिळेल, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने शारजील खान याला बजावले आहे.

पाकिस्तान लीगमध्ये स्पॉट फिक्‍सिंग केल्याबद्दल शारजीलवर पाच वर्षांची बंदी ऑगस्ट 2017 मध्ये घालण्यात आली होती. आता यातील निम्मी बंदी रद्द होऊ शकेल, असेही बंदीचा निर्णय घालताना पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक लवादाने सांगितले होते. इस्लामाबाद युनायटेडकडून खेळलेल्या शारजीलसह खलीद लतीफ, मोहम्मद इरफान, मोहम्मद नवाझ, नासीर जमशेद आणि शाहझैब हसन दोषी ठरले होते.

शारजील सप्टेंबरमध्ये होणाऱ्या कैद ए आझम करंडक स्पर्धेत खेळू शकेल; पण त्याने चूक मान्य करावी; तसेच त्याबद्दल माफीही मागावी, असे पाक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सलमान बट्ट आणि महम्मद आसीफ यांच्यावर स्पॉट फिक्‍सिंगमधील बंदी या प्रकारेच रद्द झाली होती, याची आठवण त्यांनी करून दिली.

शारजील पुनर्वसन प्रक्रियेस जाण्यास तयार आहे, असे यापूर्वीच पाक मंडळास कळवण्यात आले आहे. पुनर्वसन प्रक्रियेतील सहभाग म्हणजेच चूक मान्य करून माफी मागणे आहे, असा दावा शारजीलचे वकील शैघान एजाझ यांनी केला आहे. शारजीलने त्याच्यावरील पाच आरोप स्वीकारले आहेत; पण आपला स्पॉट फिक्‍सिंगमध्ये सहभाग होता; तसेच त्याद्वारे आपला आर्थिक फायदा झाला, हे मान्य करण्यास शारजील तयार नाही, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT