Paris Olympic 2024 Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : तिरंदाजी संघासोबत आता विवादास्पद फिजिओ

यंदा भारतीय तिरंदाजांकडून पॅरिस ऑलिंपिकमध्ये हमखास पदकाची आशा बाळगली जात असतानाच वाद निर्माण होताना दिसत आहेत. कोरियन प्रशिक्षक बेक वूंग की यांना अधिस्वीकृती नाकारण्यात आल्यामुळे त्यांना भारतात परतावे लागले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : यंदा भारतीय तिरंदाजांकडून पॅरिस ऑलिंपिकमध्ये हमखास पदकाची आशा बाळगली जात असतानाच वाद निर्माण होताना दिसत आहेत. कोरियन प्रशिक्षक बेक वूंग की यांना अधिस्वीकृती नाकारण्यात आल्यामुळे त्यांना भारतात परतावे लागले आहे.

भारतीय ऑलिंपिक संघटनेनेच आपली अधिस्वीकृती नाकारल्याची टीका बेक यांनी याप्रसंगी केली. एवढेच नव्हे तर उच्चस्तरीय प्रदर्शनीय संचालक संजीव सिंग यांनाही सहायक स्टाफमध्ये स्थान मिळाले नाही. अशा परिस्थितीत रविवारी आणखी एक घडामोड समोर आली आहे.

कॅनडाच्या खेळाडूशी अयोग्य प्रकारे सामोरे गेल्याचा आरोप असलेले अरविंद यादव यांची भारतीय तिरंदाजी संघाचे फिजिओ म्हणून निवड करण्यात आली आहे. जी व्यक्ती विवादात अडकली आहे, त्या व्यक्तीची निवड केल्यामुळे आता चोहोबाजूंनी टीका केली जात आहे.

आयर्लंडमध्ये मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात युथ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेदरम्यान अरविंद यादव यांनी कॅनडाच्या तिरंदाजाशी सोशल मीडियावर विचारणा केली होती.

याबाबत कॅनडाचे प्रशिक्षक यांनी जागतिक तिरंदाजी संघटनेकडे तक्रार केली होती. भारतीय तिरंदाजी संघटनेकडून घेण्यात आलेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. अरविंद यादव यांनी कॅनडाच्या खेळाडूसोबत साधेपणाने संवाद साधला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणतेही पाऊल उचलण्यात येणार नाही, असे या बैठकीत ठरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Portugal vs Congo DR : ख्रिस्तियानो रोनाल्डो 'म्हातारा' झाला... सहावा वर्ल्ड कप खेळणाऱ्या सुपरस्टारसोबत नेमकं काय घडलं ते वाचा...

T20 World Cup, IND vs NED : भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय, नेदरलँड्सला चारली धूळ! शफाली वर्माची बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही कमाल

IND A vs AFG A: आधी बॉल हातातून सुटला, पण वैभव सूर्यवंशीने मागे वळून हवेत झेपावत घेतला अफलातून झेल, पाहा Video

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

SCROLL FOR NEXT