Luis Suarez try to bite colombian player sakal
क्रीडा

Luis Suarez try to bite: लुईस 'चावा'रेझ...; कोलंबियाकडून पराभवानंतर उरुग्वेचा स्टार खेळाडू चिडला, Video

Luis Suarez try to bite colombian player - बॅड बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला उरुग्वेचा स्टार खेळाडू लुईस सुआरेझ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Copa America 2024 Luis Suarez : २०१४ च्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत इटालियन डिफेन्डर जॉर्जिओ चिएलिनी याचा चावा घेल्यानंतर लुईस सुआरेझवर ४ महिन्यांची बंदी घातली गेली होती. प्रचंड प्रतिभा असलेला हा खेळाडू त्याच्या या एका कृत्यामुळे बॅड बॉय लिस्टमध्ये गेला. या प्रकारानंतर सुआरेझ सुधरला आहे असे वाटत असताना आज पहाटे झालेल्या पुन्हा सुआरेझ चर्चेत आला.

१० खेळाडूंसह खेळणाऱ्या कोलंबिया संघाने कोपा अमेरिका स्पर्धा २०२४ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात उरुग्वेचा पराभव केला आणि त्यानंतर सुआरेझने कोलंबियन खेळाडूचा चावा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सामना संपल्यानंतर जेव्हा दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करत असताना कर्णधार सुआरेझ कोलंबियन खेळाडूच्या जवळ केला अन् त्याच्या मानेजवळ चावण्यासाठी गेल्याचे दिसतेय. त्यानंतर कोलंबियन खेळाडूने त्याला लगेच ढकलले आणि इतर खेळाडू सुआरेझच्या अंगावर धावून गेले. सुरक्षारक्षकांनी वेळीच परिस्थिती हाताळली.

२३ वर्षानंतर कोलंबिया फायनलमध्ये

कोलंबियाने १-० अशा फरकाने उरुग्वेला नमवून २३ वर्षानंतर कोपा अमेरिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ३९व्या मिनिटाला जेफेर्सन लेर्माने केलेला गोल निर्णायक ठरला आणि फायनलमध्ये कोलंबियाचा सामना लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाशी होणार आहे.

बॅड बॉय सुआरेझ...

२०१४च्या घटनेपूर्वी २०१० मध्ये सुआरेझ अजाक्स क्लबकडून खेळताना पीएसव्ही इनडोव्हेनच्या ओत्मन बक्कलला चावला होता आणि त्यासाठी त्याच्यावर ७ सामन्यांची बंदी घातली गेली होती. त्यानंतर २०१३ मध्ये लिव्हरपूलकडून खेळताना चेल्सीच्या ब्रॅनिस्लोव्ह इव्हानोव्हिचच्या हातावर चावला. त्यासाठी त्याला १० सामन्यांची बंदीची शिक्षा भोगावी लागली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT