Copa America 2024 final Argentina vs Colombia SAKAL
क्रीडा

Copa America 2024 Final : मेस्सी विजेतेपदाचे वर्तुळ पूर्ण करणार? कोपा अमेरिका स्पर्धेत कोलंबियाच्या धसमुसळ्या खेळाचे आव्हान

Copa America 2024 final Argentina vs Colombia : गतवर्षी कोपा अमेरिका करंडक जिंकून लिओनेल मेस्सीने आपल्या मुकुटात आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचा पहिला तुरा खोवला होता. त्यानंतर विश्वविजेतेपदाचा करंडकही उंचावला आणि या वेळीही कोपा अमेरिका करंडक जिंकून तो वर्तुळ पूर्ण करणार का, याची उत्सुकता फुटबॉल विश्वाला लागून राहिली आहे.

Kiran Mahanavar

गतवर्षी कोपा अमेरिका करंडक जिंकून लिओनेल मेस्सीने आपल्या मुकुटात आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचा पहिला तुरा खोवला होता. त्यानंतर विश्वविजेतेपदाचा करंडकही उंचावला आणि या वेळीही कोपा अमेरिका करंडक जिंकून तो वर्तुळ पूर्ण करणार का, याची उत्सुकता फुटबॉल विश्वाला लागून राहिली आहे.

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यात अंतिम सामना होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी ५.३० वाजता ही अंतिम लढत सुरू होईल. त्यावेळी सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा मेस्सीवर असणार आहे.

अर्जेंटिनाने विश्वविजेतेपदाच्या थाटात अंतिम फेरी गाठली. उपांत्य सामन्यात त्यांनी कॅनडाचे आव्हान मोडून काढले. यात मेस्सीचा गोल निर्णायक ठरला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात १० खेळाडूंसह खेळणाऱ्या कोलंबियाने उरुग्वेवर मात केली. या सामन्यातून कोलंबियाचा स्टार खेळाडू जेम्स रॉड्रिगेझने आपले नाव इतिहासात लिहिले. कोपा अमेरिका स्पर्धेत गोलांसाठी सहाय्य करण्याचा विक्रम त्याने मेस्सीला मागे टाकून मोडला. या स्पर्धेत त्याने सहा गोलांना सहाय्य केले. २०२१च्या स्पर्धेत मेस्सीने पाच गोलांना सहाय्य करण्याचा विक्रम केला होता.

अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचे पारडे जड असले तरी कोलंबियाचा संघ धसमुसळ्या खेळासाठी प्रसिद्ध आहे. उरुग्वेविरुद्धच्या सामन्यात त्यांनी मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यांचे प्रशिक्षक नेस्टॉर लॉरेन्झो यांनी उपांत्य फेरीच्या त्या सामन्यात राखीव खेळाडू खेळवण्याची संख्या मर्यादित ठेवली होती. रॉड्रिगेझला तर त्यांनी ६२व्या मिनिटाला मैदानात आणले होते. अर्जेंटिनाचा संघ हा पारंपरिक खेळ करणारा संघ आहे. उद्याच्या सामन्यात कोलंबियाचे खेळाडू निश्चितच मेस्सीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे इतर खेळाडूंसाठी गोल करण्याचा मार्गही तयार होऊ शकतो.

अर्जेंटिना-कोलंबिया आमने-सामने

एकूण लढती ४३

विजय ः अर्जेंटिना २५

कोलंबिया ९

अनिर्णित ः ९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT