क्रीडा

'अफगाणिस्तानमध्ये महिलांना खेळू दिलं तरच..', क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तिथल्या क्रिकेट विश्वाच्या भविष्यावरही टांगती तलवार आहे.

मेलबर्न - अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तिथल्या क्रिकेट विश्वाच्या भविष्यावरही टांगती तलवार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध होणारा एकमेव कसोटी सामनासुद्धा रद्द करण्याचे संकेत दिले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे म्हणणे आहे की, तालिबान अफगाणिस्तानात महिला क्रिकेटवर बंदी घालणार असेल तर नोव्हेंबरमध्ये होणाऱी कसोटी रद्द करण्यात येईल.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानमधील महिला क्रिकेट संघाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं असं म्हटलं की, तालिबानच्या सरकारने महिलांना क्रिकेट खेळू न देण्याचे वृत्त जर खरे असेल तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तानविरोधात कसोटी सामन्याचे आयोजनही होणार नाही.

महिलांच्या क्रिकेटलासुद्धा आम्ही पुरुषांइतकेच महत्त्व देतो. महिलांना खेळू दिलं जाणार नसेल तर अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियात खेळता येणार नाही. राशिद खानसारख्या क्रिकेटपटूला ऑस्ट्रेलियात कसोटी खेळताना पहायचे आहे. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा रोया समीम आणि तिच्या टीमला क्रिकेट खेळू दिलं जाईल.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकमेव कसोटी २७ नोव्हेंबरला खेळण्यात येणार होती. अफगाणिस्तान क्रिकेटसाठी सध्याचा काळ कठीण आहे. महिला क्रिकेटवर बंदी घातल्यास अफगाणिस्तानवर आयसीसीचे सदस्यत्व गमावण्याची वेळ येऊ शकते. महिला क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळत असतील तरच आयसीसीकडून सदस्यत्व दिले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची बाजारपेठेत गर्दी

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT