babar azam
babar azam social media
क्रीडा

पाहुणीच होणार बाबरची नवरी!

सुशांत जाधव

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) साखरपुडा उरकून टाकल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, त्याने आपल्या पाहुणीसोबत साखरपुडा केला असून पुढच्या वर्षी तो विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच 26 वर्षीय बाबर आझमकडे पाकिस्तानच्या तिन्ही प्रकारातील नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. (cricket babar azam engaged to his cousin reports marriage next year)

काही दिवसापूर्वीच पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अझर अलीने बाबरने आता लग्न करण्याची वेळ आल्याचे म्हटले होते. ट्विटरच्या माध्यमातून माजी क्रिकेटरने दिलेला सल्ला बाबरने चांगलाच मनावर घेतल्याचे दिसते. बाबर आझम क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी चर्चेत आला होता. पाकिस्तानमधील एका महिलेने बाबरवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. लग्नाचे अमिष दाखवून फसवल्याप्रकरणी बाबरवर गुन्हा देखील दाखल झाला होता. बाबरने हे आरोप फेटाळून लावत कोर्टात वकील प्रकरण बघून घेतील, अशी प्रतिक्रिया दिली होती.

बाबर आझम सध्याच्या घडीला अबु धाबीमध्ये आहे. युएईमधअये PSL-6 च्या हंगामातील उर्वरित सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत बाबर आझमने आपला धमाका दाखवुन दिला असून 5 सामन्यात त्याने 86 च्या सरासरीने 258 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरू - गुजरात येणार आमने-सामने; स्पर्धेतील आव्हान टिकवण्याचं दोन्ही संघांसमोर आव्हान

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT