क्रीडा

World Cup 2023 : 'सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाकडे स्टेडियममधील खुर्च्या साफ करण्याचे देखील नाहीत पैसे'

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 BCCI : आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 ची सुरूवात जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियममधून झाली. पहिलाच सामना हा गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील तगड्या सामन्याने झाली. मात्र या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांनी सपशेल पाठ फिरवली.

सोशल मीडियावर रिकाम्या स्टेडियमचे फोटो तुफान व्हायरल झाले. त्यानंतर स्टेडियमच्या दुरावस्थेचे देखील वाभाडे सोशल मीडियातून निघाले. सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये दाखल झालेल्या अनेक क्रिकेट चाहत्यांनी पक्षांच्या विष्ठेने माखलेल्या सीट्सचे व्हिडिओ शेअर करत बीसीसीआयवर टीका केली.

पहिल्या सामन्यात चाहत्यांनी सपशेल पाठ फिरवल्याचे दिसत आहे. जवळपास एक लाख आसन क्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील जवळपास सर्व सीट्स रिकाम्या पडल्या आहेत. रणजी ट्रॉफीच्या सामन्यात देखील प्रेक्षकांची याच्यापेक्षा जास्त गर्दी असते.

यामुळे बीसीसीआय (BCCI) आणि आयसीसी (ICC) या दोघांसाठी ही शरमेची बाब झाली आहे. बीसीसीआय आणि आयसीसीने तिकीट विक्रीत बराच गोंधळ घातला होता. आता स्टेडियम रिकामे पडले आहे तसेच सर्व तिकीटे देखील विकली गेलेली नाही. सामन्याच्या दिवशी बुक माय शोवर अजून तिकीट विक्री सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा, प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT