Cricket In Olympics  esakal
क्रीडा

Cricket In Olympics : क्रिकेटचा 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये होणार समावेश, आंतरराष्ट्रीय समितीची मिळाली परवानगी

अनिरुद्ध संकपाळ

Cricket In Olympics : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने क्रिकेटचा 2028 च्या लॉस एंजलेस ऑलिम्पिक गेम्समध्ये समावेश करण्यासाठी परवानगी दिली आहे. याबाबतची घोषणा आज करण्यात आली. आयओसी अध्यक्ष थॉमस बेच यांनी मुंबईतील बोर्ड मिटिंगनंतर बोलताना याची माहिती दिली.

क्रिकेट सोबतच बेस बॉल, सॉफ्ट बॉल, फ्लॅग फुटबॉल लॅक्रॉसे आणि स्क्वॉश खेळांचा देखील सामावेश करण्यासाठी समितीने परवानगी दिली आहे. मात्र या सर्व नवीन खेळांच्या बाजूने आयओसी सदस्य देशांनी देखील मतदान करणे गरजेचे आहे. यासाठी सोमवारी मतदार प्रक्रिया राबलवी जाईल त्यानंतर या खेळांचा 2028 च्या लॉस एंजलेस येथील ऑलिम्पिक गेम्समधील समावेश निश्चित होईल.

थॉमस यांनी सांगितले की, 'ऑलिम्पिक समितीने लॉस एंजलेस ऑलिम्पिकमध्ये 5 नवीन खेळ समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. समितीने तो प्रस्ताव मान्य केला आहे. यात बेसबॉल - सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लाक्रोसे, स्क्वॉश आणि क्रिकेट यांचा समावेश आहे.'

क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाचं घोडं हे वाडा (WADA) आणि बीसीसीआय यांच्यातील वादामुळे अडलं होतं.

अखेर बीसीसीआय आणि आयसीसीने 2016 मध्ये अँटी डोपिंगची जागतिक संघटना वाडाच्या धोरणांचा स्विकार केला. आता महिला क्रिकेट देखील प्रसिद्ध होऊ लागलं आहे. त्यामुळे क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाचा मार्ग मोकळा झाला.

गेली राष्ट्रकुल स्पर्धा आणि नुकतीच झालेल्या एशियन गेम्समध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाले. राष्ट्रकुल स्पर्धेत फक्त महिला क्रिकेटचा समावेश होता. तर एशियन गेम्समध्ये पुरूष क्रिकेट आणि महिला क्रिकेट दोन्हीचा समावेश होता. भारतीय महिला आणि पुरूष संघाने सुवर्ण पदक पटकावले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT