क्रीडा

Arshin Kulkarni:परीक्षा असतानाही सराव सोडला नाही अन् आज टीम इंडियामध्ये मिळालं स्थान..सोलापूरचा अर्शिन अंडर-19 टीममध्ये

Under-19 Asia Cup: अर्शिन कुलकर्णीने उंचवली महाराष्ट्राची मान ! भारताच्या अंडर-१९ संघात निवड

सकाळ डिजिटल टीम

Arshin Kulkarni in Indian U-19 Team: सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीची १९ वर्षाखालील आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. बीसीसीआयने शनिवारी (ता. २५) या संघाची घोषणा केली आहे. ८ ते १७ डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा दुबई येथे होत आहे. ८ डिसेंबरला भारतीय संघाची लढत अफगाणिस्तान विरुद्ध, १० डिसेंबरला पाकिस्तान विरुद्ध तर १२ डिसेंबरला नेपाळ विरुद्ध होणार आहे.

या आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाकडून अर्शिनची तुफानी खेळी नक्कीच पाहायला मिळणार आहे. भारतीय संघाकडून आशिया कप स्पर्धा खेळणारा अर्शिन हा सोलापूरचा पहिला खेळाडू ठरला आहे. याबद्दल सोलापूरच्या क्रिकेटप्रेमींकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नुकतीच झालेल्या एमपीएल स्पर्धेत अर्शिनने धडाकेबाज शतक झळकावले होते.सोलापूरचे बालरोग तज्ञ डॉ. अतुल कुलकर्णी यांचा अर्शिन कुलकर्णी सुपुत्र आहे.(Latest Marathi News)

भारताच्या अंडर १९ मध्ये निवड झाल्याने अतिशय आनंद झाला आहे. लहानपणापासूनच मला क्रिकेटची आवड होती. वयाच्या ६ व्या वर्षांपासून क्रिकेट खेळायला सुरवात केली. सोलापुरात अंडर १४, १७, १९ खेळलो. पुढे महाराष्ट्र प्रीमियर लीग, वीनू माकंड ट्रॉफी, एन केपी साळवे ट्रॉफी, सय्यद अली ट्रॉफीमध्ये निवड होत गेली. आशिया कपसाठी भारताच्या संघात निवड झाली. माझे स्वप्न भारताच्या सीनियर संघात खेळायचे आहे.

- अर्शिन कुलकर्णी, क्रिकेटपटू, भारत

अर्शिनची इंडियन क्रिकेट टीममध्ये निवड झाली अतिशय आनंदी आहोत. कमी वयात मोठे यश मिळविले याचा अभिमान आहे. अर्शिनने स्वतः च्या मेहनतीवर हे यश खेचून आणले आहे. भरपूर वेळ सराव करायचा परीक्षा असतानाही सराव सोडला नाही. आशिया कपमध्ये त्याने चांगली कामगिरी करावी व देशाचे नाव रोशन करावे आणि भारतीय वरिष्ठ संघात पदार्पण करावे हीच सदिच्छा आहे. (Latest Marathi News)

- अतुल कुलकर्णी, अर्शिनचे वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सोशल मीडियावरील TRP ला तुमचे यश समजण्याची चूक करू नका; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा कुणाला सल्ला?

Radhanagari Dam Water Level : गगनबावड्यासह 12 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; राधानगरी धरणात 85 टक्के पाणीसाठा, कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली

Latest Marathi Update : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी जंतर-मंतरवर दाखल

PM Narendra Modi On Paper Leak : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! पेपरफुटीच्या प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी

Ujani Dam: उजनी धरणातील आवक १२,७९७ क्युसेकवर; उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्के, धरणातून ५,५७० क्युसेक विसर्ग कायम

SCROLL FOR NEXT