Mohammad Shahzad Cricketer Photo Viral
Mohammad Shahzad Cricketer Photo Viral Sakal
क्रीडा

स्टार क्रिकेटरनं मैदानातच मारला सिगारेटचा झुरका; अन्...

सुशांत जाधव

बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या बांगलादेश प्रिमीयर लीग स्पर्धेत अफगानिस्‍तानच्या स्टार खेळाडूच्या कृत्यानं सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. मोहम्मद शहजाद (Mohammad Shahzad) मैदानात स्मोकिंग करताना क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोशल मीडियावर त्याचा फोटो तुफान व्हायरल (Cricketer Photo Viral) होत आहे. पावसामुळे खेळात व्यत्यय आला होता. पाऊस उघडल्यानंतर काही खेळाडूंसोबत मोहम्द शहजाद मैदानात आला. मैदानात फेरफटका मारताना तो चक्क सिगारेट ओढताना दिसले.

पावासामुळे खेळ थांबल्यानंतर अनेकदा खेळाडू कॉफी किंवा चहाचा आनंद घेताना दिसले आहेत. मात्र कदाचित ही पहिलीच वेळ होती ज्यात खेळाडू मैदानात स्मोकिंग करताना पाहायला मिळाले. स्टार खेळाडू रेन ब्रेकमध्ये सिगारेटच कश मारताना दिसल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्यावर चौहूबाजूंनी टीका होत आहे.

मैदानात स्मोकिंग केल्याप्रकरणी मॅच अधिकाऱ्यांनी शहजादला फटकारले आहे. शिस्तभग कलामनुसार त्याच्यावर कारवाईही करण्यात आली आहे. भर मैदानात सिगारेट ओढण्याच्या प्रकारामुळे त्याच्या खात्यात आता एक डीमेरिट पॉइंट जमा झाला आहे. आयसीसीच्या 2.20 कोड ऑफ कंडक्‍ट या कलमानुसार त्याच्यावर कारवाई झाली आहे. शहजाद हा मिनिस्‍टर ग्रुप ढाका संघाचा सदस्य आहे.

4 फेब्रुवारी रोजी मिनिस्‍टर ग्रुप ढाका आणि कोमिला विक्‍टोरियन्स यांच्यात सामना होता. पावसामुळे हा सामना होई शकला नाही. पावसाने उंसत घेतल्यानंतर शहजाद इतर खेळाडूंसह मैदाना आला. यादरम्यान तो सिगारेटचे कश मारताना दिसले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. शहजादने आपली चूक कबूल केली असल्याचा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या विनोदी अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधलं होते. सिलहट सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात तो धावबाद झाला होता. यावेळी पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने पुष्पातील श्रीवल्ली गाण्यावर ठूमके मारत तंबूचा रस्ता धरला होता. या गोष्टीची चांगलीच चर्चा झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT