ind vs sl bengaluru pitch below average  Sakal
क्रीडा

श्रीनाथ यांनी बंगळुरु खेळपट्टीवर मारला 'लाल शेरा'

सकाळ डिजिटल टीम

भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या मैदानात झालेल्या डे-नाइट कसोटी सामन्यात भारतीय संघाने दिमाखदार विजय नोंदवला. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. मात्र आता भारतीय संघाच्या या दिमाखदार खेळाला खेळपट्टीमुळं गालबोट लागलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) धक्का दिलाय.

मॅच रेफ्री जवागल श्रीनाथ यांनी डे-नाइट कसोटी सामन्यासाठी वापण्यात आलेल्या खेळपट्टीवर सरासरीपेक्षा कमी दर्जाची खेळपट्टी असल्याचा शेरा मारला आहे. त्यामुळे बंगळुरुच्या खेळपट्टीला आयसीसी पिच अँण्ड आउटफील्ड मॉनीटरिंग प्रक्रियेनुसार एक डिमेरिट पाँइंट देण्यात आलाय.

भारतीय संघाने बंगळुरु कसोटी सामन्यात 238 धावांनी दिमाखदार विजय मिळवला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ही मॅच तिसऱ्या दिवशीच संपवली. या सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी लक्षवेधी कामगिरी केली होती. अश्विन चार विकेट घेतल्या होत्या. तर बुमराहनं पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात तीन विकेट मिळवल्या होत्या.

श्रीलंकेकडून कर्णधार दिमुथ करुणारत्ने एकटा लढला होता. त्याने कसोटी कारकिर्दीतील 14 वे शतक झळकावले. पण ही खेळी श्रीलंकन संघाचा पराभव टाळू शकली नाही. भारतीय संघाने या सामन्यात श्रीलंकेसमोर 447 धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 208 धावांत आटोपला होता. याआधी मोहाली कसोटीत भारतीय संघाने डावासह 222 धावांनी लंकेला धूळ चारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT