DJ Bravo
DJ Bravo Sakal
क्रीडा

ब्रावो भारताचा 'कर्जदार'; स्वत: शेअर केली Brand Value ची कहाणी

सुशांत जाधव

वेस्‍ट इंडीज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो (DJ Bravo) याने आपली एक विशेष ओळख तयार केलीये. सध्याच्या घडीला तो एक ब्रँड बनलाय. आयपीएल स्पर्धेतील दमदार कामगिरीनं तो मालामालही झाला. कॅरेबियन स्टारच्या यशात भारताचा मोठा वाटा आहे. ब्रावोनं स्वत: याविषयी मोकळेपणाने भाष्य केले आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर ब्रावो आता ब्रावो फॅशन क्षेत्रात करियर अजमावत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात नाव फक्त अन् फक्त भारतामुळे होऊ शकले, अशी भावना ब्रावोच्या मनात आहे. त्यामुळेच भारताबद्दल कृतज्ञता वाटते, असे मत त्याने व्यक्त केले आहे.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळल्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसले होते. ब्रावो (DJ Bravo) आपल्या क्रिकेट कारकिर्दीशिवाय संगीत आणि ‘डीजेबी47 फॅशन लेबल’ सोबत नवी इनिंग सुरु करत आहे. ब्रावोनं या ब्रँडच्या माध्यमातून भारताशी असणारे नाते कायम राहणार आहे. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीमध्ये ब्रावोने भारतसोबतच्या नात्यासंदर्भात भाष्य केले. तो म्हणाला की, जर भारताची साथ मिळाली नसती तर जगात आता जेवढ नाव आहे तेवढ झालं नसते, अशी भावना व्यक्त केलीये. भारतामुळे माझी लोकप्रियता दुप्पट झाली. भारतीयांकडू प्रेम मिळाले. त्यामुळे संगीत आणि क्रिकेट या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा भारताला मी कधीच विसरु शकत नाही.

बायो-बबलमध्ये क्रिकेट खेळण्याचे अनुभव देखील ब्रावोनं शेअर केले. या वातावरणात खेळणं कठीण असले तरी काही सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या, असे तो म्हणाला. बायो-बबलमध्ये खेळण आव्हानात्मक होते. सकारात्मक बाबीचा विचार करुन सर्व गोष्टींना समारे गेलो, असे सांगत लवकरच क्रिकेट या सर्वातून बाहेर पडेल, असा विश्वास त्याने व्यक्त केलाय.

फॅशन ब्रँडविषयी काय म्हणाला ब्रावो...

ड्रेसिंग करणं ही आवड असल्यामुळे फॅशन क्षेत्र नेहमीच खुणावत होते. नव्या ब्रँडसह आता नव्या दिशेनं पाउल टाकले आहे. लोकांना मोठ्या संख्येनं आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील असेन, असेही तो म्हणाला. ब्रावोच्या फॅशन ब्रँडला कशी पसंती मिळणार? हे येणारा काळच ठरवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT