cricket Prithvi Shaw also has captaincy potential Gautam Gambhir sakal
क्रीडा

Gautam Gambhir : पृथ्वी शॉमध्येही कर्णधारपदाची क्षमता; गौतम गंभीर

माजी सलामीवीर गौतम गंभीर याचे मत

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘हार्दिक पंड्याने आपल्या कर्णधार पदाच्या कौशल्याने गुजरातच्या संघाला यंदाच्या वर्षीचे आयपीएल विजेतेपद जिंकून दिले आहे. तसेच हार्दिक एक आक्रमक फलंदाज असल्यामुळे तो भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सुद्धा चंगल्यारीत्या सांभाळू शकतो’’ असा विश्वास माजी खेळाडू गौतम गंभीर याने व्यक्त केला आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाने ( फिक्की) आयोजित केलेल्या एका क्रीडा विषयक कर्यक्रमात गंभीर बोलत होता , तेव्हा त्याने पृथ्वी शॉकडेही चांगले नेतृत्व गुण असल्याचा उल्लेख केला.

‘‘हार्दिक पंड्या भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार असेल. त्याने गुजरातच्या संघाला चांगले नेतृत्व करत त्यांच्या आयपीएलच्या पहिल्याच मौसमात विजेते केले आहे. मात्र केवळ एकाच आयसीसी स्पर्धेच्या निकालावरून सध्याचा कर्णधार रोहित शर्माला पदमुक्त करणे हे सोयीचे ठरणार नाही असेही गंभीर पुढे म्हणाला.’’

पृथ्वी शॉ याचा सुद्धा गंभीरने भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणून उल्लेख केला आहे. ‘‘ पृथ्वी गेले काही महिने खराब फॉर्ममधून जात असला तरी तो सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. फलंदाज जेवढा आक्रमक असतो तेवढाच तो चांगला फलंदाज असतो.’’ त्याच्या मैदनाबाहेरील कृतींवर लक्ष ठेवणे हे भारताच्या वरिष्ठ निवड समितीचे आणि संघाच्या मुख्य प्रशिकांचे काम आहे, असेही गंभीर म्हणाला. हार्दिक गेले कित्येक वर्षे मुंबई इंडियन्सच्या संघाकडून आयपीएल खेळला आहे. मागच्या वर्षीच्या लिलावामध्ये त्याला गुजरात टायटन्सने १५ कोटी रुपये खर्च करून आपल्या संघात घेतले होते.

त्याने पदार्पण करणाऱ्या गुजरातच्या संघाला विजेतेपदा पर्यंत यशस्वी रित्या पोचवले होते. त्यामुळे आता रोहितच्या जागी त्याची राष्ट्रीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात यावी असे मत अनेक क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत . यावर्षीच्या जून महिन्यातील भारताच्या आयर्लंड दौऱ्यात ट्वेंटी-२० संघाचा हार्दिक कर्णधार होता. त्यात भारताने २-० असे धवल यश प्राप्त केले होते. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडमधील ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेतसुद्धा त्याने भारताच्या संघाचे नेतृत्व करत १-० असा विजय मिळवून दिला होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : मराठा आंदोलक जरांगे पाटील बैठकीसाठी बीडला रवाना

SCROLL FOR NEXT