Stumping Sakal
क्रीडा

Cricket Rules : यष्टिचित, कनकशन नियमात बदल

आयसीसीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार यष्टिचित व कनकशन या दोन बाबींमध्ये बदल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

दुबई - आयसीसीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार यष्टिचित व कनकशन या दोन बाबींमध्ये बदल करण्यात आला आहे.

आयसीसीच्या नव्या नियमानुसार आता यष्टिचीतसाठी अपील करण्यात आल्यास रिप्लेमध्ये फक्त यष्टिचीत बघितले जाणार आहे. यष्टिचीतआधी फलंदाज खेळताना त्याच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाली की नाही हे आता रिप्लेमध्ये बघितले जाणार नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये खेळा़डूंकडून यष्टिचीतचे अपील जाणूनबुजून करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. फलंदाजाचा पाय रेषेच्या आत असला तरी पंचांकडे यष्टिचीतचे अपील केले जाते. अशा परिस्थितीत रिव्ह्यू मागितल्यानंतर तिसऱ्या पंचांना मग यष्टिचीतसोबतच फलंदाजाच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाला की नाही हेही बघावे लागते.

त्यामुळे यष्टिरक्षण करणाऱ्या संघाला डीआरएस घेण्याची गरज भासत नाही. असे चित्र वारंवार होताना दिसत आहे. यामुळे आयसीसीकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

उपचारासाठी चार मिनिटे

आयसीसीकडून कनकशनच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. कनकशनचा प्रसंग घडला असल्यास जो खेळाडू बाहेर जात असेल आणि त्या खेळाडूला गोलंदाजीसाठी निलंबित केले असेल, तर त्याच्याऐवजी मैदानात येणाऱ्या खेळाडूलाही गोलंदाजी करता येणार नाही. तसेच आता दुखापत झाल्यावर खेळाडूंना उपचारासाठी मैदानात फक्त चार मिनिटांचाच अवधी देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

Pune Metro Expansion : पुणे मेट्रोचा विस्तार २०० किलोमीटरवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो भवनचे उद्‍घाटन

CM Devendra Fadnavis : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मे मध्ये धावणार; २३ किलोमीटरच्या मार्गिकेचे दोन टप्प्यांत उद्‍घाटन

Dharashiv Accident: तुळजापूर-लातूर महामार्गावर भीषण अपघात; तीन वाहनांची धडक, एक ठार

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT