Steve Waugh sakal
क्रीडा

Steve Waugh : हा तर कसोटी क्रिकेटला संपवण्याचा प्रकार

दक्षिण आफ्रिका मंडळाच्या निर्णयावर स्टीव वॉ यांनी तिखट शब्दांत केली टीका.

सकाळ वृत्तसेवा

सिडनी - मायदेशातील व्यावसायिक ट्वेन्टी-२० लीगला सर्वाधिक महत्त्व देताना त्याच काळात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दुय्यम संघ पाठवणार असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव वॉ यांनी आयसीसी आणि बीसीसीआयवरही जोरदार टीका केली आहे. कसोटी क्रिकेटची यांना पर्वा नसल्याचे वॉ यांनी म्हटले आहे.

या दौऱ्यासाठी बहुतांश नवोदित खेळाडूंची निवड करताना दक्षिण आफ्रिकेने अजूनपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूकडे कर्णधारपद दिले आहे. दोन कसोटी सामन्यांची ही मालिका आहे. दक्षिण आफ्रिका टी-२० लीगचे हे दुसरे पर्व आहे. यात सर्व संघमालक आयपीएलमधील आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेतील सर्व प्रमुख खेळाडू या लीगमधील विविध संघांशी करारबद्ध आहेत.

दक्षिण आफ्रिका मंडळाच्या या निर्णयावर स्टीव वॉ यांनी तिखट शब्दांत टीका केली आहे. व्यावसायिक लीगसाठी सर्व प्रमुख खेळाडू देशात खेळवताना त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पर्वा नाही. मी जर न्यूझीलंड मंडळाचा सदस्य असतो, तर आम्ही या मालिकेत खेळलो नसतो. हा तर न्यूझीलंड क्रिकेटवरही केलेला अन्याय आहे. कसोटी क्रिकेटला संपवण्याचा हा प्रकार आहे. आयसीसी, बीसीसीआय तसेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने या निर्णयाविरोधात भूमिका स्पष्ट करून असा प्रकारा थांबवायला हवा, असे वॉ म्हणतात.

इतिहास आणि परंपरा पैशांच्या मोहापुढे महत्त्वाची आहे. सर डॉन ब्रॅडमन, गारफिल्ड सोबर्स अशा खेळाडूंना अतिव दुःख होईल. दक्षिण आफ्रिकेने हा प्रकार पहिल्यांदाच केला असे नाही; तर गतवर्षी त्यांनी स्वतःच्या या लीगसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका रद्द केली होती, असे वॉ यांनी म्हटले आहे.

आयसीसी किंवा बक्कळ पैसा कमावणारी क्रिकेट मंडळ कसोटी सामन्यांसाठी कायमस्वरूपी रचना का करत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाला कसोटीचे महत्त्व कायम राहील. नाही तर प्रत्येक खेळाडू टी-१० आणि टी-२० प्रकाराला प्राधान्य देत राहील आणि पूर्ण ताकदीचे संघ खेळवले नाहीत तर कसोटी क्रिकेटचे नुकसान होत राहील, अशी खंतही वॉ यांनी व्यक्त केली. वेस्ट इंडीज मंडळाने हा प्रकार अगोदरच सुरू केलेला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्यांचा सर्वोत्तम खेळाडूंचा संघ कसोटी मालिकेसाठी पाठवलाच जात नाही, असे सांगताना वॉ यांनी निकोरस पूरनचे उदाहरण दिले. पूरन हा कसोटीचा फलंदाज आहे? जेसन होल्डर हा कसोटी क्रिकेटचा पाया असलेला खेळाडू, पण तो आता कसोटी खेळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT