Shubman Gill shikhar dhawan
Shubman Gill shikhar dhawan  sakal
क्रीडा

Shubman Gill : शिखर धवनचा शुभमन गिलला पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताच्या एकदिवसीय संघात सध्या सलामीचा फलंदाज म्हणून शुभमन गिलला अधिक पसंती दिली जात आहे. यामुळे अनुभवी शिखर धवन मात्र मागे पडला आहे. मागील डिसेंबर महिन्यापासून त्याने एकदिवसीय सामना खेळलेला नाही.

याच पार्श्वभूमीवर शिखर धवन म्हणाला, शुभमन गिल गेल्या काही दिवसांमध्ये कसोटी व टी-२० अशा दोन्ही प्रकारात छान फलंदाजी करीत आहे. या कालावधीत तो अधिक आंतरराष्ट्रीय सामनेही खेळला आहे. मला जास्त खेळता आलेले नाही. त्यामुळे निवड समिती सदस्य असतो, तर नक्कीच शिखरऐवजी गिललाच प्राधान्य दिले असते, असे तो पुढे स्पष्ट सांगतो.

रोहित शर्माची कर्णधारपदी नियुक्ती झाली. तसेच प्रशिक्षकपदी राहुल द्रविड आले. तेव्हा दोघांनी मला सपोर्ट केला. त्यांनी क्रिकेटवर लक्ष देण्यास सांगितले. त्यामुळे मी २०२३मधील विश्‍वकरंडक डोळ्यांसमोर ठेवला; पण एखाद-दुसऱ्या मालिकेत माझ्याकडून धावा झाल्या नाहीत; अन्‌ युवा खेळाडूंसाठी दरवाजे उघडे झाले. त्यांनी या संधीचे सोने केले. इशान किशन यानेही द्विशतक झळकावले. त्याचप्रसंगी वाटले की, आता मी संघाबाहेर होईन, असे धवन म्हणाला.

वर्षभराची कामगिरी मागे राहते

एखादा खेळाडू वर्षभर चांगला खेळ करतो; पण एखाद्या मालिकेत त्याच्याकडून छान कामगिरी झाली नाही, तर केव्हा केव्हा वर्षभराची कामगिरी मागे राहते. फक्त अपयशाची मालिका बघितली जाते. हे फक्त माझ्यासोबत घडलेले नाही. इतर खेळाडूंसोबतही अशा घटना घडलेल्या आहेत, अशी नाराजीही धवनने व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT