Cricket World Cup sakal
क्रीडा

Cricket World Cup 2023 : विजयामुळे अफगाणिस्तानही; उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम

हे आव्हान तसे मोठे नसले तरी अफगाणचे दोन्ही सलामीवर ५५ धावांत बाद झाले होते, मात्र

सकाळ वृत्तसेवा

लखनौ - एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना धक्का देणाऱ्या अफगाणिस्तानने आजच्या सामन्या अपेक्षेप्रमाणे नेदरलँड्सचा सात विकेटने पराभव केला आणि उपांत्य फेरीतील आपल्या आव्हानातील जान कायम ठेवली.

खेळपट्टी फिरकीस थोडी तरी साथ देणारी असली की अफगाणचे गोलंदाज त्यावर प्रभाव पाडतात हे तीन मोठ्या संघांना धक्का देताना दिसून आले आहे. आज लखनौच्या खेळपट्टीवर त्यांनी नेदरलँड्सचा डाव १७९ धावांत संपुष्टात आणला आणि त्यानंतर विजयाचे लक्ष ३१.३ षटकातच पार केले.

या सामन्यात विख्यात फिरकी गोलंदाज रशीद खानला एकही विकेट मिळाली नसली तरी मोहम्मद नबी आणि नूर अहमद यांनी मिळून पाच विकेट मिळवल्या. वेगवान गोलंदाज मुजीबने एका विकेटचे योगदान दिले. मात्र नेदरलँड्सचे उर्वरित चार फलंदाज धावचीत करण्याची चपळता अफगाणिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी दाखवली.

हे आव्हान तसे मोठे नसले तरी अफगाणचे दोन्ही सलामीवर ५५ धावांत बाद झाले होते, मात्र त्यानंतर रेहमत शाह आणि कर्णधार हशमतुल्ला शाहिदी यांनी अर्धेशतके करत संघाचा विजय सोपा केला. त्याचबरोबर विजय कमीत कमीत षटकात मिळवल्यामुळे त्यांनी सरासरीही उंचावली.

संक्षिप्त धावफलक

नेदरलँडस ४६.३ षटकांत १७९ (मॅक्स ओ`दोद ४२ -४० चेंडू, ९ चौकार, स्कायब्रँड इंगेलब्रेच ५८, कॉलीन अॅकरमन २९, मोहम्मद नबी ९.३-१-२८-३, नूर अहमद ९-०-३१-२) पराभूत वि. अफगाणिस्तान ः ३१.३ षटकांत३ बाद १८१(रेहमत शाह ५२ - ५४ चेंडू, ८ चौकार, हशमतुल्ला शाहिदी नाबाद ५६ - ६४ चेंडू, ६ चौकार, अझमतुल्ला ओमझारी नाबाद ३१)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT