क्रीडा

Harbhajan Singh:भज्जीने इंझमामची काढली चांगलीच खरडपट्टी ! हरभजन इस्लाम धर्म स्विकारणार असल्याचा इंझमामने केला होता दावा

नुकताच सोशल मीडियावर पाकिस्तान संंघाचा दिग्गज खेळाडू याचा खळबळ निर्माण करणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Manoj Bhalerao

Harbhajan Singh Replied Inzamam: नुकताच सोशल मीडियावर पाकिस्तान संंघाचा दिग्गज खेळाडू याचा खळबळ निर्माण करणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांने माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंह यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या व्हिडीओमध्ये इंझमामने सांगितलं आहे की, भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगला पाकिस्तानमध्ये धर्म बदलायचा होता.

इंझमामच्या या वक्तव्यामुळे भारतात खळबळ उडाली आहे. इंझमामचे हे वक्तव्य जेव्हा हरभजनपर्यंत पोहोचले तेव्हा त्याला उत्तर देण्यास त्याने अजिबात उशीर केला नाही. भज्जीने लगेच माजी पाकिस्तानी कर्णधाराला फटकारले.

भज्जीने खडसावलं

हरभजन सिंगने इंझमाम उल हकचा हा व्हिडीओ रिट्विट करताना विचारले आहे की , हा कोणती नशा पिऊन बोलतोय? मला भारतीय असल्याचा अभिमान आहे आणि मला शीख असल्याचा अभिमान आहे. हे मूर्ख लोक काहीही बोलतात. इंझमामच्या या व्हिडिओबद्दल भारतीयांमध्येही संताप आहे. हरभजनच्या या पोस्टवर भारतीय चाहत्यांनी इंझमामला चांगलच फटकारलं आहे.(Latest Marathi News)

इंझमाम उल हक काय म्हणाला होता?

ज्या व्हिडीओमध्ये भज्जीने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकवर भाष्य केले आहे, त्यात इंझमाम म्हणत आहे की, हरभजन एकेकाळी त्याच्या मौलानाच्या प्रभावाखाली होता आणि तो जे काही बोलायचा त्याला भज्जी दुजोरा देत होता. इंझमामने या व्हिडीओमध्ये इरफान पठाण, झहीर खान आणि मोहम्मद कैफ यांचीही नावे घेतली आहेत.

इंझमाम म्हणाला की, पाकिस्तानमधील खेळाडूंनी नमाजसाठी आणि अभ्यासासाठी एक वेगळी खोली बनवली होती जिथे इरफान पठाण, मोहम्मद कैफ आणि झहीर खान यांच्यासह काही भारतीय खेळाडूही जात असत. तो नमाज म्हणत नव्हता पण तो ऐकायचा . भज्जीवर त्या मौलानाचा खूप प्रभाव होता आणि त्याला त्याच्यासारखे व्हायचे होते, असे इंझमामने सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT