New Zealand
New Zealand sakal;
क्रीडा

Cricket World Cup : न्यूझीलंडच्या मार्गात पावसाचा अडथळा; उपांत्य फेरीसाठी महत्त्वाच्या लढतीत श्रीलंकेशी झुंजणार

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर - पहिल्या चार लढतींमध्ये विजय मिळवल्यानंतर नंतरच्या चार लढतींमध्ये पराभूत झाल्यामुळे न्यूझीलंडच्या एकदिवसीय विश्‍वकरंडकातील उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशांना सुरुंग लागला आहे. आता उद्या (ता. ९) त्यांच्यासमोर अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत श्रीलंकेचे आव्हान असणार आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना या लढतीत विजय आवश्‍यक आहे.

अर्थात त्यांना इतर देशांच्या लढतींच्या निकालांवरही अवलंबून रहावे लागणार आहे. मात्र न्यूझीलंडच्या मार्गात पावसाचा अडथळा असणार आहे. न्यूझीलंड - श्रीलंका यांच्यामधील लढतीत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यातआली आहे.

न्यूझीलंडने सुरुवातीच्या चार लढतींमध्ये इंग्लंड, नेदरलँड्‌स, बांगलादेश व अफगाणिस्तान या देशांना पराभूत करीत दमदार पाऊल टाकले होते. त्यानंतर मात्र भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान यांच्याकडून त्यांना निराशेला सामोरे जावे लागले. या चारही लढतींमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सपाटून मार खावा लागला आहे.

ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी हे अनुभवी गोलंदाज सपशेल अपयशी ठरत आहेत. डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर याने आतापर्यंत १४ फलंदाज बाद केले आहेत. त्याच्याकडून समाधानकारक गोलंदाजी होत आहे. पार्टटाईम गोलंदाज ग्लेन फिलिप्स याच्या गोलंदाजीवर त्यांना अधिक प्रमाणात अवलंबून रहावे लागत आहे.

वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे काही सामने बाहेर होता; पण उद्याच्या लढतीत त्याचे पुनरागमन होणार आहे, अशी माहिती लढतीच्या पूवसंध्येला न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने दिली.

दुखापतींचा फटका

न्यूझीलंडच्या संघाला यंदाच्या स्पर्धेमध्ये खेळाडूंना झालेल्या दुखापतींचा फटका बसला. केन विल्यमसन, जेम्स निशाम, मॅट हेनरी व लॉकी फर्ग्युसन या प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे सर्व लढतींमध्ये सहभागी होता आले नाही. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ प्रत्येक सामन्यात पूर्ण ताकदीसह उतरला नाही.

रवींद्र, मिचेल वगळता फलंदाजीतही निराशा

न्यूझीलंड संघाला फलंदाजी विभागात मोठे यश संपादन करता आलेले नाही. राचिन रवींद्र व डॅरेल मिचेल यांचा अपवाद वगळता न्यूझीलंडच्या फलंदाजांना सातत्यपूर्ण फलंदाजी करता आलेली नाही. रवींद्र याने तीन शतके व दोन अर्धशतकांसह ५२३ धावांचा पाऊस पाडला असून मिचेल याने एक शतक व दोन अर्धशतकांसह ३७५ धावा चोपून काढल्या आहेत. डेव्होन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, टॉम लॅथम यांना सूर गवसला नाही. केन विल्यमसन याने दोन अर्धशतके झळकावली; पण दुखापतीमुळे तो प्रत्येक सामन्यात खेळू शकला नाही.

विजयाने निरोप

श्रीलंकन संघाचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आठ सामन्यांमधून त्यांना फक्त दोनच लढतींमध्ये विजय मिळवता आले आहेत. श्रीलंकन संघ उद्या आपला अखेरचा सामना खेळणार आहे. मायदेशात रवाना होण्याआधी विजय मिळवण्यासाठी त्यांचा संघ प्रयत्न करील. श्रीलंकेच्या विजयाने मात्र न्यूझीलंडच्या स्वप्नांना सुरुंग लागू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT