Afghanistan beat New Zealand by 84 runs T20 World Cup 2024 sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

NZ vs AFG : टी-20 वर्ल्ड कपमध्ये मोठी उलथापालथ! अफगाणिस्तानने न्यूझीलंड संघाला दिला मोठा धक्का; रशीदचा कहर

Afghanistan beat New Zealand by 84 runs : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या चौदाव्या सामन्यात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. या सामन्यात राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला.

Kiran Mahanavar

New Zealand vs Afghanistan T20 World Cup 2024 : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या चौदाव्या सामन्यात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. या सामन्यात राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला.

या वर्ल्ड कपमधला हा दुसरा मोठा अपसेट आहे. यापूर्वी अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला होता, आता अफगाणिस्तानने किवी संघाला हरवून मोठा धक्का दिला आहे. असे कुणालाही वाटले नव्हते, मात्र या सामन्यात अफगाणिस्तानने 84 धावांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात अफगाणिस्तानने किवी संघाला अवघ्या 75 धावांत ऑलआउट केले.

रहमानउल्ला गुरबाजने शानदार खेळी

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत अफगाणिस्तान संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आणि स्कोअर बोर्डवर 159 धावा लावल्या.

अफगाणिस्तानसाठी रहमानुल्ला गुरबाजने केवळ 56 चेंडूत 80 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने आपल्या बॅटने 5 चौकार आणि 5 षटकार मारले. याशिवाय इब्राहिम झद्राननेही 44 धावांची शानदार खेळी केली. अशाप्रकारे अफगाणिस्तानने किवी संघासमोर विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

क्षणभर असे वाटले की किवी संघ हे लक्ष्य गाठेल, कारण न्यूझीलंडच्या फलंदाजीत सखोलता आहे. पण 160 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला किवी संघ अवघ्या 75 धावांवर ऑलआऊट झाला आणि सामना 84 धावांनी गमवावा लागला.

किवी संघाची फलंदाजी फ्लॉप

न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा पहिल्याच चेंडूवर फिन ऍलनची विकेट पडली. यानंतरही किवी संघ एकामागून एक विकेट्स गमावत राहिला. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा हा पराभव खूप मोठा आहे.

न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 18 धावांची खेळी केली. याशिवाय मॅट हेन्रीने 12 धावा केल्या. हे दोन फलंदाज सोडले तर इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही आणि एकापाठोपाठ एक विकेट गमावत राहिले. दोन किवी फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT