मुजीब उर रहमान मुजीब उर रहमान
क्रिकेट वर्ल्ड कप

पदार्पणातच विक्रम; मुजीब उर रहमानचा विश्वचषकात विक्रम

सकाळ डिजिटल टीम

अबुधाबी : सोमवारी ग्रुप बी मध्ये धमाकेदार सामना झाला. अफगाणिस्तानने स्कॉटलंडविरुद्ध खेळलेल्या सामन्यात तब्बल १३० धावांनी विजय मिळवला. या सामन्याचे आकर्षण होते फिरकीपटू. युवा फिरकीपटू मुजीब उर रहमान व स्टार फिरकीपटू राशीद खान या दोघांनी नऊ गडी बाद करून स्कॉटलंडची कमर तोडली. धमाकेदार विजयासह युवा फिरकीपटू मुजीब उर रहमानने विक्रम आपल्या नावावर केला.

अफगाणिस्तानने स्कॉटलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करीत चार गडी गमावून १९० धावांचे डोंगर उभारले होते. यामुळे स्कॉटलंडला चांगल्या सुरुवातची गरज होती. मात्र, त्यांची फलंदाजी चालली नाही. अवघ्या ६० धावांवर संघ बाद झाला. फिरकीपटू मुजीब उर रहमान व राशीद खान यांनी नऊ गडी बाद करून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

या सामन्याचा आकर्षण ठरला मुजीब उर रहमान. त्याचा हा पदार्पणाचा सामना होता. त्याने चार षटकात पाच गडी बाद करून विक्रम केला. टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात पाच विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. मुजीब उर रहमान टी-२० वर्ल्डकपमध्ये पाच विकेट घेणारा अफगाणिस्तानचा सर्वांत युवा तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा युवा गोलंदाज ठरला आहे. त्याची गोलंदाजी इतकी घातक होती की स्कॉटलंडचा संघ ६० धावांवर गारद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT