क्रिकेट वर्ल्ड कप

Afg vs Ban : अफगाणिस्तानकडे इतिहास रचण्याची संधी? सेमी-फायनलमध्ये जाण्यासाठी बांगलादेशशी लढणार

Afghanistan vs Bangladesh T20 World Cup 2024 : माजी विजेत्या ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय मिळवल्यानंतर अफगाणिस्तानकडे इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

Kiran Mahanavar

Afghanistan vs Bangladesh T20 World Cup 2024 : माजी विजेत्या ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय मिळवल्यानंतर अफगाणिस्तानकडे इतिहास रचण्याची संधी असणार आहे. अफगाणिस्तानचा संघ टी-२० विश्करंडकातील सुपर आठ फेरीतील अखेरचा सामना आज (ता. २५) बांगलादेशशी खेळणार आहे.

या लढतीआधी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील लढत सोमवारी पार पडेल. या लढतीवर अफगाणिस्तानचे या स्पर्धेतील भवितव्य अवलंबून असणार आहे. अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचल्यास प्रतिष्ठेच्या स्पर्धेची अंतिम चार फेरी गाठण्याची त्यांची पहिलीच खेप असणार आहे.

टी-२० विश्‍वकरंडकातील गट एकमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान यांच्यातील दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचणार आहेत. भारतीय संघाचा नेट रनरेट सर्वात चांगला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का आहे, पण ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान यांच्यामध्ये रस्सीखेच लागली आहे. एका स्थानासाठी दोन संघांमध्ये चढाओढ लागली आहे. गट दोनमधून दक्षिण आफ्रिका व इंग्लंड हे दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. अफगाणिस्तान-बांगलादेश यांच्यामधील लढतीच्या निकालानंतर गट एकमधील चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT