Afghanistan vs Bangladesh Live Score, T20 World Cup 2024 Rain stops play in Kingstown sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

AFG vs BAN सामन्यात पावसाचा तांडव, मॅच रद्द झाल्यास ऑस्ट्रेलियाला बसणार धक्का! जाणून घ्या समीकरण

Afghanistan vs Bangladesh T20 World Cup 2024 Rain stops play in Kingstown : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा 52 वा सामना अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे.

Kiran Mahanavar

Afghanistan vs Bangladesh T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा 52 वा सामना अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. तिन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यात अफगाणिस्तान आणि बांगलादेश खेळत आहेत पण ऑस्ट्रेलियाच्याही नजरा या सामन्यावर खिळल्या आहेत.

याचे कारण म्हणजे अफगाणिस्तानने हा सामना जिंकला तर कांगारू संघ टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर जाईल. मात्र, सामन्यादरम्यान पाऊस आला आणि सामना रद्द झाल्यास तरी ऑस्ट्रेलियाला धक्का बसणार आहे.

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 115 धावा केल्या. मात्र, अफगाणिस्तानचा डाव संपताच जोरदार पाऊस सुरू झाला. आता जर सतत पाऊस पडत राहिला आणि सामना झाला नाही तर बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ वर्ल्ड कपमधून बाहेर होतील.

अफगाणिस्तानचा संघ 3 गुणांसह उपांत्य फेरीत जाईल, तर ऑस्ट्रेलियाचे केवळ 2 गुण असतील. या कारणामुळे जर ऑस्ट्रेलियाला अंतिम-4 मध्ये जायचे असेल तर अफगाणिस्तानसाठी हा सामना गमावणे खूप महत्वाचे आहे.

तिन्ही संघांना उपांत्य फेरीतील प्रवेशाचे दरवाजे खुले

वर्ल्ड कप सेमी-फायनलमध्ये जाण्यासाठी या सामन्यात तिन्ही संघांना संधी आहेत. अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत जायचे असेल तर त्यांना हा सामना कसा तरी जिंकावाच लागेल. एका धावेने विजय मिळवला तरी ते उपांत्य फेरीत जातील. त्याचवेळी बांगलादेशने मोठा विजय मिळवला तरी ऑस्ट्रेलियासाठी मोठा धोका असेल.

बांगलादेश संघालाही उपांत्य फेरीत जाण्याची संधी आहे. त्यांना अफगाणिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा 12.1 षटकांत पाठलाग केला तर ते उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. जर त्यांनी असे केले तर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ बाहेर पडतील आणि बांगलादेश संघ फक्त एक विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करेल. त्यामुळे तिन्ही संघांचे समीकरण अद्यापही खुले असून कोणताही संघ उपांत्य फेरीत जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT