Babar Azam breaks MS Dhoni sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Babar Azam : बाबर आझमने मोडला MS धोनीचा 'ग्रँड रेकॉर्ड'! कर्णधार म्हणून केली मोठी कामगिरी

Babar Azam breaks MS Dhoni : पाकिस्तान संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 ला विजयासह निरोप दिला. रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने आयर्लंडचा तीन गडी राखून पराभव केला.

Kiran Mahanavar

Babar Azam breaks MS Dhoni : पाकिस्तान संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 ला विजयासह निरोप दिला. रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने आयर्लंडचा तीन गडी राखून पराभव केला. पाकिस्तानच्या या विजयात शाहीन शाह आफ्रिदी आणि इमाद वसीम यांच्याशिवाय कर्णधार बाबर आझमचाही मोठा वाटा आहे, ज्याने 32 धावांची नाबाद खेळी खेळली. बाबर आझमने या खेळीने एक मोठा विक्रम केला आहे.

बाबर आझमने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात 32 धावा केल्या, यासह तो टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.

बाबर आझमने मोडला धोनीचा विक्रम

बाबर आझमने टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून 549 धावा केल्या आहेत. त्याने अवघ्या 17 डावात या धावा केल्या आहेत. याआधी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर होता, त्याने 29 डावात 529 धावा केल्या होत्या.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  • 549 – बाबर आझम (17 डाव)*

  • 529 – एमएस धोनी (29 डाव)

  • 527 - केन विल्यमसन (19 डाव)

  • 360 - एम जयवर्धने (11 डाव)

  • 352 – ग्रॅम स्मिथ (16 डाव)

शाहीन शाह आफ्रिदी (तीन विकेट) आणि इमाद वसीम (तीन विकेट) यांच्या घातक गोलंदाजीनंतर कर्णधार बाबर आझम (नाबाद 32 धावा) यांच्या संघर्षपूर्ण खेळीच्या जोरावर पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात आयर्लंडचा तीन विकेट्स राखून पराभव केला.

पाकिस्तान संघाने आयर्लंडला 106 धावांवर रोखले आणि हे लक्ष्य 18.5 षटकांत पूर्ण केले. शाहीन शाह आफ्रिदीला सामनावीराचा किताब देण्यात आला. आफ्रिदीने तीन विकेट घेतल्या आणि पाच चेंडूत १३ धावांची नाबाद खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT