Team India | T20 World Cup 2024 X/ICC
क्रिकेट वर्ल्ड कप

Team India Prize Money: मोठी बातमी! BCCI ने T20 वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघासाठी केली तब्बल 125 कोटींच्या बक्षीसाची घोषणा

T20 World Cup 2024: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचं विजेतेपद जिंकल्याबद्दल भारतीय संघासाठी बीसीसीआयने १२५ कोटींच्या बक्षीसाची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

T20 World Cup Winner Team India Prize Money: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत बार्बाडोसला झालेल्याअंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला.

या विजयानंतर भारतीय संघावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच बीसीसीआयनेही मोठी घोषणा करत भारतीय संघातील सदस्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

या विजयानंतर बीसीसीआयने भारतीय संघासाठी तब्बल १२५ कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

त्यांनी आपल्या X खात्यावरून ही घोषणा करत संपूर्ण संघाचे अभिनंदन केले. जय शहा म्हणाले, "भारतीय संघाच्या टी२० वर्ल्ड कप विजयाबद्दल १२५ कोटींचे पारितोषिक जाहीर करताना मला आनंद होत आहे. संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट प्रतिभा, निर्धार आणि खिलाडूवृत्ती दाखवली. सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन!"

दरम्यान, भारतीय संघाला टी२० वर्ल्ड कप २०२४ विजेता म्हणून आधीच आयसीसीकडून २.४५ दशलक्ष डॉलर्स (२०.४० कोटी रुपये) बक्षीस रक्कम मिळणार आहे.

अंतिम सामन्यात भारताने मिळवला विजय

अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १७६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. तसेच अक्षर पटेलने ४७ धावांची आणि शिवम दुबेने २७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि एन्रिक नॉर्किया यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तसेच मार्को यान्सिन आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ८ बाद १६९ धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून हेन्रिक क्लासेनने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. तसेच क्विंटन डी कॉकने ३९ धावांची आणि ट्रिस्टन स्टब्सने ३१ धावांची खेळी केली. याशिवाय डेव्हिड मिलरनेही २१ धावा केल्या. मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही.

भारतीय संघाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच आर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेलने १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT