Shubman Gill | Avesh Khan Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup चालू असतानाच शुभमन गिल अन् आवेश खान का परतले भारतात? अखेर टीम इंडियाच्या कोचनेच केला खुलासा

Team India: टी20 वर्ल्ड कपमधील सुपर-8 फेरीपूर्वी शुभमन गिल आणि आवेश खान मायदेशी परतण्यामागील कारण भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाने सांगितले आहे.

Pranali Kodre

Shubman Gill - Avesh Khan: अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे सध्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील भारतीय संघाचे अमेरिकेतील पहिल्या फेरीचे सामने संपले आहे. अशातच भारतीय संघाबरोबर राखीव खेळाडू म्हणून गेलेले शुभमन गिल आणि आवेश खान हे दोन खेळाडू परत मायदेशी परतले आहेत.

गिल आणि आवेश अचानक मायदेशी परतल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. गिल आणि भारतीय संघात काहीतरी बिनसल्याच्या चर्चाही झाल्या. अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार गिलवर शिस्तभंगाची कारवाई म्हणून भारतात पाठवण्यात आले.

त्यातच राखीव खेळाडूंमध्ये असलेले रिंकु सिंह आणि खलील अहमद मात्र भारतीय संघासहच असल्याने या चर्चांना आणखीच वाव मिळाला. पण अखेर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी गिल आणि आवेश यांना मायदेशी पाठवण्याचे खरे कारण सांगतले आहे.

कॅनडाविरुद्ध शनिवारी होणारा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषदेत राठोड यांनी सांगितले की दोन खेळाडूंना परत पाठवण्याची योजना सुरूवातीपासूनच ठरली होती.

ते म्हणाले, 'आम्ही जेव्हा अमेरिकेला आलो, तेव्हा चार राखीव खेळाडू आमच्याबरोबर आले. त्यानंतर दोन खेळाडूंना संघातून मुक्त करण्यात आले आणि दोन खेळाडू आमच्यासह वेस्ट इंडिजला प्रवास करणार आहे. जेव्हा संघाची निवड करण्यात आली होती, त्याचवेळी ही योजना ठरलेली होती. हीच योजना होती, जी अंमलात आणण्यात आली.'

याशिवाय त्यांनी कॅनडाविरुद्धचा सामना रद्द झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली. दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या टी20 वर्ल्ड कपसाठी गिल, आवेश, रिंकु आणि खलील हे राखीव खेळाडू आहेत.

यांच्यातील रिंकु आणि खलील हे भारतीय संघासह कॅरेबियन बेटांवर सोबत असणार आहे. भारतीय संघाने सुपर-8 फेरीत प्रवेश केला असून त्यांचे आता या फेरीतील सामने कॅरेबियन बेटांवर होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Mumbai News: ‘एल्फिन्स्टन’मुळे म्हाडा मालामाल! ८३ घरांच्या माध्यमातून मिळणार तब्बल ९६ कोटी रुपये

"आणि मी कारमधील गणपतीची ओरबाडून काढून फेकली" जुई गडकरीने सांगितला तो प्रसंग; "मी हॉस्पिटलमध्ये.."

SCROLL FOR NEXT