Hardik-Pandya-Ahmed-Shehzad-Collision
Hardik-Pandya-Ahmed-Shehzad-Collision 
क्रिकेट वर्ल्ड कप

Video: धडामssssssss हार्दिक अन् शहजादमध्ये झाली जोरदार टक्कर

विराज भागवत

सामन्याच्या १९व्या षटकात घडला प्रकार | IND vs AFG in T20WC

IND vs AFG, T20 World Cup 2021: भारतीय संघाने तुलनेने कमकुवत समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्ताच्या फलंदाजांची धुलाई करत २० षटकात २१० धावांपर्यंत मजल मारली. सलग सहाव्यांदा विराट कोहलीने नाणेफेक गमावल्यानंतर अफगाणिस्तानने भारताला प्रथम फलंदाजी दिली. पण त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. दोन्ही सलामीवीरांची अर्धशतके आणि मधल्या फळीची फटकेबाजी यांच्या जोरावर भारतीय संघाने २१० धावांचा डोंगर उभा केला. या डावात हार्दिक पांड्या आणि अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक अहमद शहजाद यांच्यात झालेल्या धडकेचा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला.

१९व्या षटकाचा पहिला चेंडू हार्दिक पांड्या खेळत होता. त्यावेळी हार्दिक पांड्या चेंडू हवेत उंच मारला. फिल्डर झेल पकडणारच असं साऱ्यांना वाटत होतं त्यामुळे हार्दिक आणि पंत यांनी एक धाव पूर्ण केली. पण झेल सुटल्याचं कळताच हार्दिकने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. हार्दिक दुसरी धाव घेऊन क्रीजमध्ये पोहोचला पण नेमका त्याच वेळी आलेला थ्रो पकडण्यासाठी अहमज शहजाद स्टंपच्या मागून धावत आला. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार टक्कर झाली. हार्दिकचे हेल्मेट थेट शहजादच्या कमरेला लागलं आणि तो अक्षरश: कळवळला. पण थोड्या वेळातच तो फिट होऊन पुन्हा मैदानात यष्टीरक्षणासाठी उभा राहिला.

पाहा तो धडकेचा व्हिडीओ-

दरम्यान, भारताच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २ बाद २१० धावा कुटल्या. केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल १४० धावांची भागीदारी केली. दोघांनीही दमदार अर्धशतके झळकावली. रोहितने ४७ चेंडूत ७४ धावा केल्या, तर राहुलने ४८ चेंडूत ६९ धावा केल्या. या जोडीनंतर हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांनी डाव सांभाळत तुफान फटकेबाजी केली. हार्दिकने १३ चेंडूत नाबाद ३५ तर ऋषभ पंत १३ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या आणि संघाला द्विशतकी मजल मारून दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणे पोलिसांनी दाखल केला रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, काय आहे कारण?

LTTE Ban: राजीव गांधींची हत्या करणाऱ्या संघटनेवरील बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवली; मोदी सरकारचा निर्णय

The Great Indian Kapil Show: "मुलींसारखे कपडे घालून लोकांच्या मांडीवर बसणे, हे घृणास्पद!"; 'द कपिल शर्मा' शोवर भडकला कॉमेडियन

PM Narendra Modi: मोदींच्या डोक्यावर शिवशाही जिरेटोप ! वाराणसीमधील उमेदवारी अर्जानंतर प्रफुल्ल पटेलांनी केला सत्कार

Marathi News Live Update: मोदी-शहांना दिलासा, सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या द्वेषपूर्ण भाषणांविरोधी याचिक

SCROLL FOR NEXT