Team India  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

शास्त्रींचा ड्रेसिंग रुममधील अखेरचा क्षण, व्हिडिओ व्हायरल

शास्त्रींच ड्रेसिंग रुममधील भाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सुशांत जाधव

विराट कोहली (Virat Kohli) ने भारतीय टी20 संघाचे नेतृत्व सोडले आहे. टी 20 वर्ल्‍ड कप 2021 (T20 World Cup 2021) स्पर्धेतील 42 वा सामना कोहलीच्या कॅप्टन्सीमधील अखेरचा सामना ठरला. याशिवाय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांचाही कार्यकाळ संपुष्टात आला आहे. कोहली-शास्त्री यांना निरोप देताना भारतीय संघाने नामिबियाला 9 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड स्पर्धेची सांगता विजयाने केली.

कोहली आणि शास्‍त्रींनी स्पर्धेपूर्वीच आपले पद सोडणार असल्याचे स्पष्ट केले होते. या जोडीला आयसीसीची ट्रॉफी जिंकता आली नसली तरी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली आणि कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे.

कोहली आणि शास्‍त्री नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कोहली ने शास्‍त्रींना खास अंदाजात शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने मुख्‍य प्रशिक्षक रवि शास्‍त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना जादू की झप्पी देत गुडबाय केले. याशिवाय शास्त्रींनी ड्रेसिंग रुममध्ये सर्व खेळाडूंचे आभार मानले. पाच वर्षांच्या कालावधीत टीम इंडियाने सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवली आहे. क्रिकेटच्या सर्वच प्रकारातील संघाची कामगिरी अभिमानास्पद असल्याचे सांगत शास्त्रींनी संघातील खेळाडूंचा निरोप घेतला. ड्रेसिंग रुममधील निरोप समारंभातील त्यांचे भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT