AUS vs OMAN T20 World Cup 2024 esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

David Warner Video : डेव्हिड वॉर्नर 51 चेंडूत 56 धावा करून बाद झाला अन् पॅव्हेलियनचा रस्ताच विसरला

AUS vs OMAN T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाने ओमानचा 39 धावांनी पराभव करत ग्रुप स्टेजमधील आपला पहिला विजय साजरा केला.

अनिरुद्ध संकपाळ

David Warner T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्डकप 2024 च्या ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाने ओमानचा मोठा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या विजयात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा मोठा वाटा होता. त्याने दमदार फलंदाजी केली. मात्र बाद झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर गोंधळला. तो पॅव्हेलियनचाच रस्ता विसरला. डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूममध्ये जाण्याऐवजी ओमानच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहचला होता. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर तो पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहचला.

डेव्हिड वॉर्नरला ओमानच्या अनुभवी गोलंदाज कलीमुल्लाहने बाद केले. डेव्हिड वॉर्नर 19 व्या षटकात बाद झाला. तो प्रचंड थकला होता. त्यामुळे त्याला तो कोणत्या ड्रेसिंग रूममध्ये चालला आहे हे कळालं नाही. तो ओमानच्या ड्रेसिंग रूमच्या बऱ्याच पायऱ्या चढला. त्यानंतर मागून कोणीतरी त्याला आवाज दिला. त्यानंतर त्याला आपण ओमानच्या ड्रेसिंग रूममध्ये जात असल्याचे जाणवले. त्यानंतर तो खाली उतरला अन् ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूममध्ये परतला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

ऑस्ट्रेलिया विरूद्ध ओमान सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. डेव्हिड वॉर्नरच्या संथ अर्धशतकी खेळी आणि मार्कस स्टॉयनिसने आक्रमक खेळी करत ऑस्ट्रेलियाला 165 धावांपर्यंत पोहचवलं. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्युत्तरात ओमानला 20 षटकात 9 बाद 125 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने 39 धावांनी सामना जिंकला.

विशेष म्हणजे मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघात वर्ल्डकप विजेता कर्णधार पॅट कमिन्सचा समावेश नव्हता.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT