David Wiese Retires From International Cricket 
क्रिकेट वर्ल्ड कप

David Wiese Retires : टी-20 वर्ल्ड कपमधून संघ बाहेर पडताच दिग्गज खेळाडू घेतली निवृत्ती!

David Wiese Retires From International Cricket : इंग्लंडविरुद्धच्या झालेल्या सामन्यात नामिबियाच्या संघाला 41 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यासोबत टी-20 वर्ल्ड कप 2024 मधील नामिबियाचा प्रवास संपला आहे.

Kiran Mahanavar

David Wiese Retires From International Cricket : इंग्लंडविरुद्धच्या झालेल्या सामन्यात नामिबियाच्या संघाला 41 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यासोबत टी-20 वर्ल्ड कप 2024 मधील नामिबियाचा प्रवास संपला आहे. संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असून केवळ एकच सामना जिंकला आहे. याच कारणामुळे नामिबियाचा संघ सुपर-8 मध्ये पोहोचू शकला नाही. दरम्यान नामिबियाचा स्टार खेळाडू डेव्हिड व्हिसा याने निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंडविरुद्धचा सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.

आपल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात डेव्हिड व्हिसाने चांगली कामगिरी केली. सर्वप्रथम, त्याने गोलंदाजीमध्ये आपल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 6 धावा देऊन 1 विकेट घेतला आणि त्यानंतर फलंदाजीत 12 चेंडूत 27 धावा केल्या, परंतु तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

डेव्हिड व्हिसा हा नामिबियाचा क्रिकेटपटू आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. 18 मे 1985 रोजी रुडपोर्ट, दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला व्हिसा हा उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तो दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया या दोन्ही संघांसाठी खेळला आहे.

व्हिसाने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत केली. 2005-06 SAA प्रांतीय चॅलेंजमध्ये त्याने इस्टर्नसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले. देशांतर्गत स्पर्धेतही तो टायटन्सकडून खेळला. 2015 मध्ये त्याने न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळला. नंतर त्याने कोलपाक मार्ग निवडला आणि इंग्लंडमधील ससेक्ससाठी काउंटी क्रिकेट खेळला.

एकूणच, डेव्हिड व्हिसाने त्याच्या कारकिर्दीत 15 एकदिवसीय आणि 54 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने एकदिवसीय सामन्यात 330 धावा आणि टी-20 मध्ये 624 धावा केल्या. व्हिसाने एकदिवसीय सामन्यात 15 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 66 बळी घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नीलेश घायवळ टोळीतील मुसाब शेखला अटक; शेखच्या ताब्यातून ८७८ ग्रॅम गांजा जप्त, अन्य एकजण ताब्यात

Pune Crime : पुण्यातील घरफोडीप्रकरणी सराईत गुन्हेगार २४ तासांत अटकेत

Latest Marathi News Live Update : सिडको भूखंड घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकारला फटकार

Pune Crime : मकोका गुन्ह्यातील फरार आरोपी करण कुंभार गजाआड

Pune Books On Wheel : ‘एनबीटी’च्या फिरत्या पुस्तक बसचे उद्‍घाटन; वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी उपक्रम

SCROLL FOR NEXT