Matthew Hayden Matthew Hayden
क्रिकेट वर्ल्ड कप

भारत-पाकच्या खेळाडूंबद्दल हेडनने व्यक्त केले मत; म्हणाला...

सकाळ डिजिटल टीम

टीम ई सकाळ

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि भारताकडे नेहमी कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून बघितले जाते. दोन्ही देशांमध्ये खेळला जाणार सामना जणू बॉर्डरवर होणारे युद्धच आहे, असे चित्र निर्माण केले जाते. यामुळे दोन्ही संघामध्ये होणाऱ्या सामन्याची नेहमीच चर्चा होत असते. यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानने भारताला पराभूत करून पहिल्यांदा विजय मिळवला. असे असले तरी भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंचे सामन्यानंतरचा एकोपा पाहून ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडन खून झाला.

विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पहिल्यांदा पराभव केला. हा पराभव असा तसा नाही तर तब्बल दहा गडी राखून केला. यामुळे भारतीय खेळाडूंवर चांगलीच नाराजी व्यक्त केली जात आहे. पराभव झाला याचे दुख नाही; मात्र असा दारुण पराभव झाल्याने चाहते नाराजी व्यक्त करीत आहे. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान हा विजय मिळविल्यानंतर विराट कोहलीला मिठी मारताना दिसत होता.

हे छायाचित्र पाहून ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर व T-२० संघाचा पाकिस्तानचा फलंदाजी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या मॅथ्यू हेडन चांगलीच प्रशंसा केली आहे. दोन्ही देशांच्या खेळाडूंनी आपल्या वागण्याने क्रिकेटविश्वासमोर आदर्श निर्माण केला आहे. सामना संपल्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, शोएब मलिक व वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी सोबत चर्चा करताना दिसला. हे खरचं कौतुक करण्यासारखे असल्याचे हेडनने आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.

हेच खेळामध्ये व्हायला पाहिजे

द्वंद हे सामन्यापुरते मर्यादित असते. सामन्यात विजय मिळो किंवा पराभव त्यानंतर तुम्ही एकमेकांशी चांगले वागायला हवे. याचे उत्तम उदाहरण पाकिस्तान व भारताच्या खेळाडूंनी सामना संपल्यानंतर दिले. हेच खेळामध्ये व्हायला पाहिजे. धोनीला पाकिस्तानी खेळाडूंशी संवाद साधताना, विराट कोहली आणि रिझवानचे मैदानावरील दृश्य पाहून आनंद झाल्याचे हेडन म्हणाला.

आफ्रिदीच्या स्पेलने प्रभावित

हेडन पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या सलामीच्या स्पेलने चांगलाच प्रभावित झाला आहे. शाहीन आफ्रिदीने सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुलची विकेट घेऊन भारताची कंबर तोडली होती. त्याच्या गोलंदाजीत गती असल्याचे तो म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMCला मिळाला नवा महापौर! भाजपच्या रितू तावडे यांचं शिक्षण काय? त्यांना पगार किती मिळणार?

Jalgaon Mayor Election : जळगावात महायुतीचा गुलाल! दीपमाला काळे महापौर तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

ZP Elections 2026 Voting Live Update : पूर्व दिल्लीतील मयूर विहार पॉकेट १ मेट्रो स्टेशनचे नाव बदलून 'श्री राम मंदिर मयूर विहार' असे केले

Ladki Bahin Yojana : धुळ्यातील 'लाडक्या बहिणीं'ना मोठा दिलासा! ५१ हजार अर्जांची अंगणवाडी सेविकांमार्फत घरपोच पडताळणी

T20 World Cup: सर्वाधिक धावा, शतकं अन् विकेट्स.... कोणाच्या नावावर कोणता विक्रम? पाहा संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT