Gautam Gambhir T20 World Cup 2024 esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Gautam Gambhir : यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट कुठली असू शकते.... विराट-रोहितच्या निवृत्तीवर गंभीरने दिली प्रतिक्रिया

Gautam Gambhir T20 World Cup 2024 : गौतम गंभीरने टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर प्रतिक्रिया दिली. तसेच तो रोहित अन् विराटच्या निवृत्तीवर देखील बोलला.

अनिरुद्ध संकपाळ

Gautam Gambhir On Virat Kohli Retirement : भारताने तब्बल 17 वर्षानंतर टी 20 वर्ल्डकप जिंकला. दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्डकपवर नाव कोरलं. फायनलमध्ये 76 धावांची झुंजार खेळी करणाऱ्या विराट कोहलीने फायनलनंतर टी 20 वर्ल्डकपमधून निवृत्तीची घोषणा केली. पाठोपाठ रोहित शर्माने देखील प्रेस कॉन्फरन्समध्ये निवृत्ती जाहीर केली.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी गौतम गंभीरने टीम इंडियाचे प्रशिक्षक पद हातात घेण्यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली आहे. दरम्यान या दोघांच्या निवृत्तीवर गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे.

गौतम गंभीर म्हणाला की, 'संपूर्ण देश खूप खूश आहे. मी रोहित शर्मा आणि संपूर्ण संघाचे अभिनंदन करतो.' गंभीरने विराट अन् रोहितच्या निवृत्तीबाबत देखील वक्तव्य केले.

तो म्हणाला, 'टी 20 वर्ल्डकप जिंकून आपली टी 20 कारकीर्द संपवणे यापेक्षा चांगली दुसरी गोष्ट कोणती असू शकते. हे दोघेही महान खेळाडू आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी बरेच योगदान दिले आहे. मी त्या दोघांचे अभिनंदन करू इच्छितो तसेच ते वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळणार आहेत. ते देशाच्या यशात आपले योगदान देतील.'

भारताने टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर संघातील तीन वरिष्ठ खेळाडूंनी टी 20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी टी 20 फॉरमॅटला अलविदा केलं.

यंदाच्या टी 20 वर्ल्डकपनंतर हे तिघे निवृत्त होतील अशी शक्यता पूर्वीच वर्तवली होती. त्यामुळे या तिघांचा हा शेवटचा टी 20 वर्ल्डकप होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT