Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Rumors sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Hardik Pandya : 'ही कठीण वेळ...' पत्नी नताशासोबत घटस्फोटाच्या अफवांदरम्यान हार्दिक पांड्याचे मोठं वक्तव्य

Hardik Pandya Natasa Stankovic : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, त्याचं चर्चेत येण्याचं कारण क्रिकेट नसून वैयक्तिक आयुष्य आहे.

Kiran Mahanavar

Hardik Pandya T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, त्याचं चर्चेत येण्याचं कारण क्रिकेट नसून वैयक्तिक आयुष्य आहे. त्याच्या आणि नताशा स्टॅनकोविकच्या लग्नाबाबत अनेक अफवा आहेत. जवळपास चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघे वेगळे झाल्याचा दावा केला जात आहे.

या सगळ्यापासून दूर असलेला हार्दिक पांड्या अमेरिकेत टीम इंडियासाठी घाम गाळत आहे. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने चांगली तुफानी फटकेबाजी केली. सामन्यानंतर हार्दिकने सांगितले की, तो कठीण काळातून जात आहे.

हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मध्ये ट्रोलिंगचा चांगलाच शिकार झाला होता. हार्दिकची कामगिरीही विशेष नव्हती आणि त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स पण पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानी होती. मात्र, हा अष्टपैलू हार्दिक पांड्या सराव सामन्यात लयीत दिसला. त्याने 23 चेंडूंचा सामना करत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या.

सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्याने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधत आपल्या मनातील भावना शेअर केल्या. तो म्हणाला, 'आयुष्य अनेकदा तुम्हाला कठीण प्रसंगात टाकते. पण मला वाटतं जर तुम्ही खेळ आणि मैदान सोडलं तर तुम्हाला हवं ते मिळणार नाही. हे अवघड आहे पण मी नेहमी करत आलो तेच करत आहे.

तो पुढे म्हणाले, 'या गोष्टी घडतात, कधी चांगला काळ येतो तर कधी वाईट. मी याआधीही अशा प्रसंगातून गेलो आहे आणि मी परतही आलो आहे. मी यशाला फारसे गांभीर्याने घेत नाही. जेंव्हा मी काही चांगलं करतो तेंव्हा मी ते विसरून पुढे जातो. आज कठीण काळातही मी तेच करतो त्या गोष्टीपासून पळत नाही. मी प्रत्येक गोष्टीचा सामना करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला जय शाह अन् ICC ची भीती! Asia Cup वर बहिष्कार टाकण्याचा विचार सोडला?

Latest Marathi News Updates : पुण्याला पावसाने झोडपलं

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्या परिषदेत विस्‍तृत चर्चा

Barshi Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष; बार्शीत १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा

Pune Traffic : शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT