Sunil-Gavaskar-Hardik-Pandya 
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC: "हार्दिकला बाहेर हकला अन् 'त्याला' टीममध्ये घ्या"

टीम इंडियाच्या निवडीवरून सुनील गावसकरांचा संताप | Sunil Gavaskar on Team Selection

विराज भागवत

टीम इंडियाच्या निवडीवरून सुनील गावसकरांचा संताप | Sunil Gavaskar on Team Selection

भारताच्या संघाचा टी२० विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानशी होता. गेल्या १२ सामन्यात अजिंक्य असलेला भारत यंदा मात्र पाकिस्तानकडून दहा गड्यांनी पराभूत झाला. पराभवानंतर भारताच्या संघ निवडीवर प्रश्न उपस्थित झाले. अनेकांनी हार्दिक पांड्या आणि इतर खेळाडूंच्या कामगिरीबद्दल तसेच निवडीवर प्रश्न उपस्थित केले. तोच धागा पकडत भारताचे लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी हार्दिक पांड्यावर सडकून टीका केली. तसेच, भारतीय संघाने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात काय बदल करावेत, याबद्दल सल्ला दिला.

Team-India

"जर हार्दिक पांड्या गोलंदाजी करण्यास सक्षम नसेल तर त्याला पहिले संघातून बाहेर हकला. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात तसंही त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्या वेदना त्याच्या चेहऱ्यावरही दिसत होत्या. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याला संघातून बाहेर काढा आणि त्याच्या जागी फॉर्मात असलेल्या इशान किशनला संधी द्या. अशा वेळी मी नक्कीच हार्दिकपेक्षा इशान किशनला प्राधान्य दिलं असते", असे सुनील गावसकर म्हणाले.

"संघ निवडीबद्दल बोलायचं झालं तर मी असं सूचवेन की शार्दूल ठाकूरचाही संघात विचार व्हायला हवा. भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दूल ठाकूरला संघात स्थान देणं शक्य आहे. भुवीची कामगिरी पाहता शार्दूल त्याच्यापेक्षा अधिक चांगला पर्याय आहे असं मला वाटतं. पण एका सामन्यानंतर भरपूर बदल करणंही चुकीचं ठरेल. कारण तसं झाल्यास प्रतिस्पर्धी संघाला असं वाटू शकतं की तुम्ही संघ म्हणून थोडेसे गोंधळलेले आहात. त्यामुळे नीट विचार करून निर्णय घ्या.

Sunil-Gavaskar-Team-India

दरम्यान, हार्दिक पांड्याची टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर IPL चा युएईतील हंगाम रंगला होता. त्या हंगामात त्याला गोलंदाजी करता आली नव्हती. अशा वेळी त्याला संघात का निवडलं, असा सवाल फॅन्सकडून विचारण्यात येत होता. त्यानंतर पाकिस्तानविरूद्ध त्याला संघातही घेण्यात आले. पण त्याला ८ चेंडूत केवळ ११ धावा करता आल्या. त्यानंतर तो मोठा फटका खेळताना बाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT