Hardik Pandya T20 World Cup 2024 esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Hardik Pandya : साठीतल्या हार्दिकपेक्षा... पांड्यानं सांगितलं नकारात्मक वातावरण कसं फिरवलं

Hardik Pandya T20 World Cup 2024 : हार्दिक पांड्यानं आयपीएलमध्ये निराशा केली. मात्र टीम इंडियाची जर्सी घालताच त्याची कामगिरी दमदार होऊ लागली आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya T20 World Cup 2024 : भारताचा टी 20 संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याची आयपीएलमधील कामगिरी पाहून त्याला वर्ल्डकपच्या टी 20 संघात का घेतलं असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला होता. मात्र या प्रश्नाचं उत्तर हार्दिक पांड्यानं सराव सामन्यात आणि ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात दमदार कमगिरी करत दिलं.

भारताने पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्यामुळं आयर्लंडला 96 धावात गुंडाळलं होतं. भारताने हा सामना आठ विकेट्सनी जिंकला होता.

या सामन्यानंतर हार्दिक पांड्याने कष्ट आणि सर्वतःवर विश्वास ठेवणं किती महत्वाचं असतं हे सांगितलं.

तो बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हणाला, 'कष्ट करून यश मिळाल्यामुळं चांगलं वाटतंय. जे लोकं कष्ट करतात त्यांच्यासाठी सर्व गोष्टी सुरळीत होत जातात. मी स्वतःला सांगितलं थोडा स्वतःसोबत वेळ घालव. आपण कोण आहोत हे शोधणे गरजेचे असते. मी खंबीरपणे पुन्हा उभा राहिलो कारण वयाच्या तीशीतला हार्दिकचे काम हे साठी पार केेलेल्या हार्दिकपेक्षा खूप सोपं आहे.'

हार्दिक पांड्याने आयपीएलमधील ट्रोलिंग आणि इतर नकारात्मक गोष्टी बाजूला सारत टी 20 वर्ल्डकपवर फोकस केला. त्यानं नेटमध्ये घाम गाळला अन् सार्वजनिक वावर कमी करत स्वतःला जास्त वेळ दिला. त्याचं फळ त्याला आता टी 20 वर्ल्डकपमध्ये मिळत आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठ्यांना १७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करा, अन्यथा... मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

Pune Viral : पुण्यात गणपती विसर्जनाला पैशांचा पाऊस; पाचशे, शंभरच्या नोटांचा खच, पैसे उचलायला भाविकांची झुंबड उडाली अन् पुढे जे झालं...

Latest Marathi News Updates : 'कोल्हापूर गॅझेटियर' संदर्भात महत्त्वाची पत्रकार परिषद

Who is IAS Sakshi Sawhney? युवराज सिंगने कौतुक केलं, त्या साक्षी साहनी आहेत तरी कोण? व्यक्त केली भेटण्याची इच्छा

Pune Crime : पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग, सहकाऱ्यालाही मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT