Team India Head Coach Gautam Gambhir Updates  sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Gautam Gambhir : क्रिकेटपटू, खासदार अन् आता हेड कोच! BCCI किती देणार पगार? जाणून घ्या गौतम गंभीरची संपत्ती

India Head Coach Updates : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक होणार हे जवळपास निश्चित झाली आहे.

Kiran Mahanavar

Team India Head Coach Gautam Gambhir : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक होणार हे जवळपास निश्चित झाली आहे. मंगळवारी (18 जून) गंभीरने यासाठी पहिल्या फेरीची मुलाखतही दिली आहे. आता बुधवारी दुसऱ्या फेरीची मुलाखत होणार आहे.

गंभीरने अलीकडेच कोलकाता नाइट रायडर्स संघाचे मार्गदर्शक म्हणून आयपीएल ट्रॉफी जिंकली. गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर संघाचा 10 वर्षांनंतर ट्रॉफीचा दुष्काळ संपला. केकेआरच्या यशानंतर गंभीरला राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्याची मागणी जोर धरू लागली होती.

सध्याचे भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कप संघाची मोहीम संपल्यानंतर पद सोडणार आहेत. ग्रुप स्टेजमध्ये अपराजित राहिल्यानंतर हा संघ सध्या सुपर एटच्या सामन्यासाठी बार्बाडोसमध्ये आहे. 20 जूनला हा संघ अफगाणिस्तानशी खेळणार आहे.

गंभीर प्रशिक्षक झालात तर किती पगार मिळणार?

भारतीय संघाचा प्रशिक्षक होणे ही कोणत्याही व्यक्तीसाठी मोठी गोष्ट असते. त्याचा पगारही खूप जास्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गंभीर जर कोच बनला तर त्याला 12 कोटींपेक्षा जास्त पैसे मिळतील. प्रशिक्षकाला किती पैसे मिळतात याची पुष्टी कधीच झालेली नाही.

रिपोर्ट्सनुसार, रवी शास्त्री जेव्हा प्रशिक्षक होते तेव्हा त्यांना वर्षाला 10 कोटी रुपये मिळत होते. राहुल द्रविडच्या काळात त्यात वाढ झाली. त्यांना जवळपास 12 कोटी रुपये मिळतात आणि आता गंभीर नवा प्रशिक्षक झाल्यास त्याला वाढीव पगार मिळेल.

गंभीरची एकूण संपत्ती किती?

गौतम गंभीर हा त्या माजी भारतीय खेळाडूंपैकी एक आहे ज्यांची मागणी खूप जास्त आहे. समालोचन आणि जाहिरातींमधून तो कमाई करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गंभीरची एकूण संपत्ती 205 कोटी रुपये आहे. गंभीर पिनॅकल स्पेशालिटी व्हेइकल्स (PSV), क्रिकप्ले आणि रॅडक्लिफ लॅब्स सारख्या ब्रँडशी संबंधित आहे.

गंभीरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

दिल्लीचा रहिवासी असलेल्या गंभीरने 2003 मध्ये वनडे फॉरमॅट, 2004 मध्ये टेस्ट फॉरमॅट आणि 2007 मध्ये टी20 फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2016 मध्ये खेळला होता.

गंभीरने 58 कसोटी सामन्यात 42 च्या सरासरीने 4154 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 9 शतके आणि 22 अर्धशतके झळकावली. वनडे बद्दल बोलायचे झाले तर त्याने 147 सामन्यात 39.7 च्या सरासरीने 5238 धावा केल्या. त्याने टी-20 मध्ये 37 सामन्यांत 27.4 च्या सरासरीने 932 धावा केल्याय आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT