Subramanian Swamy 
क्रिकेट वर्ल्ड कप

'तुम्हाला तर बुद्धू...' भारत-पाक सामन्यानंतर सुब्रमण्यम स्वामींचं टि्वट चर्चेत

'दहशतवादाची विक्री करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळण्यीची इतकी घाई का?'

दीनानाथ परब

नवी दिल्ली: काल दुबईमध्ये टी २० वर्ल्डकपच्या (t 20 world cup) सामन्यात पाकिस्तानने (pakistan) भारताचा १० गडी राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने पहिल्यांदाच वर्ल्डकप स्पर्धेत भारताकडून (india) पराभूत होण्याची मालिका खंडीत केली. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींसाठी (cricket fans) एक पर्वणी असतो. काहीही करुन जिंकाच अशीच दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींची भावना असते.

अन्य कुठल्याही संघाकडून पराभव होणं वेगळं आणि पाकिस्तानकडून पराभूत होणं वेगळं. खरंतर कालच्या सामन्यात विराटने कर्णधारपदाला साजेशी अर्धशतकी खेळी केली. त्याच्यामुळेच टीम इंडियाला १५० धावांचा पल्ला गाठता आला. पण पराभवानंतर चहूबाजूंनी विराटवर टीका सुरु आहे. त्याच्या काही निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

भारतात क्रिकेट एक धर्म आहे. फक्त सर्वसामान्य क्रिकेटप्रेमीच नाही, तर बॉलिवूड, राजकारणातली लोकही या खेळाशी जोडलेली आहेत. भारताच्या कालच्या पराभवानंतर माजी मंत्री आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक बीसीसीआयवर निशाणा साधणारं एक टि्वट केलं आहे. 'बीसीसीआयमधील निर्णयकर्त्यांना बुद्धू २०२१ चा किताब दिला पाहिजे' असं टि्वट स्वामींनी केलं आहे. दहशतवादाची विक्री करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळण्यीची इतकी घाई का? असा सवाल काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यम स्वामींनी विचारला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT