T20 World Cup 2024 prize Money Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup Prize Money: केवळ विजेते अन् उपविजेतेच नाही, तर सर्व 20 संघही होणार मालामाल, ICC ने केली मोठी घोषणा

T20 World Cup 2024 Prize Money: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी बक्षीस रक्कमेबद्दल आयसीसीने घोषणा केली आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024 Prize Money: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे रविवारपासून (2 जून) सुरू झाला आहे. या स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घोषणा केली आहे.

यंदाच्या स्पर्धेसाठी एकूण तब्बल 11.25 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी बक्षीस रक्कम असणार आहे. यातील 2.45 मिलियन डॉलर विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला मिळणार आहेत. ही आत्तापर्यंत स्पर्धेच्या इतिहासातील विजेत्या संघाला मिळणार सर्वोच्च रक्कम आहे.

उपविजेत्या संघाला 1.28 मिलियन डॉलरचे बक्षीस मिळणार आहे. तसेच उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन संघांना प्रत्येकी 787,500 डॉलर मिळणार आहेत.

तसेच यंदा पहिल्यांदाच तब्बल 20 संघ स्पर्धेत सहभागी झाले आहत. या सर्व संघांसाठीही बक्षीस रक्कम आहे. सुपर-8 फेरीत आव्हान संपणाऱ्या संघांना प्रत्येकी 382,500 डॉलर बक्षीस मिळणार आहे, तर जे संघ 9 ते 12 क्रमांकावर राहतील त्यांना प्रत्येकी 247,500 डॉलरचे बक्षीस असेल.

तसेच 13 ते 20 क्रमांकापर्यंत राहणाऱ्या संघांना प्रत्येकी 225,000 डॉलर बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय साखळी फेरी आणि सुपर-8 फेरीत प्रत्येक विजयासाठी संघाना ज्यादाचे 31,154 डॉलरचे बक्षीस देण्यात येईल.

या स्पर्धेत पहिल्या फेरीत 40 सामने होणार आहेत, त्यानंतर सुपर-8 मध्ये 12 सामने खेळवले जाणार आहेत, तर उपांत्य फेरीचे दोन आणि एक अंतिम सामना असे मिळून 55 सामने होणार आहेत.

पहिल्या फेरीसाठी 5-5 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. या गटातील प्रत्येकी दोन अव्वल संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर सुपर-8 मध्ये पोहचलेल्या संघांची पुन्हा दोन गटात विभागणी होईल. यानंतर दोन्ही गटातील प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्य फेरी खेळतील. उपांत्य फेरीतील विजेते संघ 29 जून रोजी अंतिम सामन्यात भिडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: आई-बाबा, मी थकलोय... युट्यूबवर व्हिडिओ बनवला, नंतर वडिलांसमोर पोरानं गळा चिरून घेतला, कारण वाचून डोळे पाणावतील

Electric Bike Fire : मुंबई-बंगळुर महामार्गावर इलेक्ट्रिक बाइकला आग; दुचाकीस्वार महिला थोडक्यात बचावली, महामार्गावर ३ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Ayush Komkar Murder Case: नातवाला संपवण्यापूर्वी बंडू आंदेकरचा सेफ प्लॅन उघड, नंबरकारी म्हणजे काय?

Pune News : लक्ष्मण हाके नवे कांशीराम म्हणून उदयास येत आहेत?

Yeola News : येवल्याच्या कन्येची जागतिक भरारी! वैष्णवी कातुरे हिच्या टीमचा ‘ड्रोन’ जागतिक स्पर्धेत तिसरा

SCROLL FOR NEXT