T20 World Cup 2024 Imran Khan  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : आयसीसीचा दणका; सामन्यादरम्यान इम्रान खान प्रेमींवर असं करण्यास घातली बंदी

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2024 Imran Khan : युएसएमध्ये सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाची अवस्था खूप बिकत आहे. त्यांच्यावर ग्रुप स्टेजमधूनच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवू शकते. असे असेल तरी पाकिस्तानला सपोर्ट करण्यासाठी युएसएच्या स्टेडियमवर चाहत्यांची गर्दी होत आहे.

याचवेळी काही पाकिस्तानी चाहत्यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थनात काही पोस्टरबाजी केली. इम्रान खान यांचे समर्थन करणारे टी शर्ट घालून देखील चाहते आले होते. त्यानंतर नासाऊ स्टेडियममधील आयसीसी सुरक्षा अधिकाऱ्यांनी या चाहत्यांना इम्रान खानच्या समर्थनात घातलेले टी-शर्ट काढायला लावले.

ही घटना पाकिस्तान विरूद्ध कॅनडा सामन्यादरम्यान झाली होती. इम्रान खान हे गेल्या वर्षभरापासून जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानने अखेर टी 20 वर्ल्डकपमधील आपला पहिला सामना जिंकला. त्यांनी कॅनडाचा सात विकेट्सनी पराभव केला. यामुळे त्यांच्या सुपर 8 मध्ये पोहचण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत.

यापूर्वी पाकिस्तानने ग्रुप स्टेजमधील आपला पहिला सामना युएसएकडून हरला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. हे दोन्ही सामने न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर झाले.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Assembly chaos: पश्चिम बंगाल विधानसभेत तुफान राडा! भाजप अन् टीएमसी आमदार भिडले

Nagpur: नागपूर होणार आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र; नागपूरला तिसऱ्या रिंगरोडची जोड, दोन्ही प्रकल्पांवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

Nashik Ganesh Visarjan : वेळेत विसर्जन! नाशिक पोलीस आयुक्तांचा गणेश मंडळांना '२० मिनिटांचा' अल्टिमेटम

Latest Marathi News Updates : महागाईला उतारा – स्वस्त कांदा-टोमॅटो थेट व्हॅनमधून !

Vena River: हिंगण्यात वेणा नदीत बुडालेल्या ऑटोचालकाचा शोध सुरू; शुभम पिल्लेवार हयात नाही

SCROLL FOR NEXT